सामाजिक

मानव सेवा हीच ईश्वर सेवा – सटवाजी पवार

[दैनिक प्रबुद्ध वृत्तपत्रातून आईला मदत करा ही बातमी व्हायरल झाल्यामुळे अनेक लोकांनी केली आईला]

सिध्दार्थ दिवेकर

उमरखेड (दि. १० ऑगस्ट) तालुक्यातील आणखी परिसरातील सावळेश्वर या गावावर दिनांक २६ जून २०२४ रोजी दोन मुलींना गावा ला लागून असलेल्या नदीत बुडत असलेले पाहून चेतन नावाचा मुलगा त्या दोन मुलींना वाचण्यासाठी गेला असता लगेच बुडत असणाऱ्या मुली भयभीत झालेल्या असल्यामुळे त्यांनी चेतन देवानंद काळबांडे ला कवटाळून वर येण्याचा प्रयत्न केला पण तो असफल झाल्याने नदीत बुडून तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.
ही गोष्ट वाऱ्यासारखी संपूर्ण तालुक्यात पोहोचली. सावळेश्वर गावावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.

चेतन हा घरातील कर्ताधर्ता नवतरुण होता त्याच्यावर सर्व कुटुंब चालत होते काही वर्षांपूर्वीच त्याचे वडिलाचे अपघाती मृत्यू झाल्याने सर्व कुटुंबाची जबाबदारी आई आणि चेतन यावर आली होती.
घरामध्ये अजून दोन मुली असून एक मुलगी अपंग आहे.

दैनिक प्रबुद्ध परिवार या वृत्तपत्रामधून प्रकाशित झालेली आईला मदत करा ही बातमी व्हायरल झाल्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव जिल्हा नांदेड येथील सटवाजी पवार सर (संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष
रयत सेवाभावी प्रतिष्ठान जवळगाव) यांनी पीडित आईला मदत म्हणून (११०००रू) अकरा हजार रुपयाचा किराणामाल देऊन एक मोठी मदत केली आहे.

सटवाजी पवार यांनी यावेळी चेतनच्या कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे आणि चेतनची जागा कोणीही आणि कितीही पैसे दिले तरीही भरून निघणार नाही पण माझ्या प्रतिष्ठानाकडून ही मदत करत आहो ही मदत कोणत्याही राजकीय पक्षाकडून नसून सामान्य जनतेकडून एक एक पैसा जमा करून मानव सेवा हीच ईश्वर सेवा ही सद्भावना मनामध्ये ठेवून पीडित आईला मदत करीत आहो. आणि ही बातमी पत्रकार सिद्धार्थ दिवेकर उमरखेड तालुका प्रतिनिधी दैनिक प्रबुद्ध परिवार यांनी मराठवाड्यातील अनेक ग्रुपमध्ये सेंड करून माझ्यापर्यंत पोहोचल्यामुळे मी ही मदत केली आहे असे प्रतिपादन यावेळी सटवाजी पवार यांनी केले.

यावेळी दहीभात सर, सुनिल लोखंडे, पत्रकार सिध्दार्थ दिवेकर, शिवाजी काळबांडे (तंटामुक्ती अध्यक्ष), विवेक रावते सामाजिक कार्यकर्ते, अनिल कांबळे (पोलीस पाटील), माधव रावते, अमोल काळबांडे इत्यादी अनेक नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!