माध्यमिक विद्यालय उमरखेड येथे राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी

शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
प्रियदर्शनी इंदिरा गांधी शिक्षण संस्थाद्वारा संचलित माध्यमिक विद्यालय उमरखेड व देशमुख कनिष्ठ महाविद्यालय उमरखेड येथे आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली व त्यानिमित्त शाळेत वृक्षारोपण करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था संचालिका सरोजताई देशमुख ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य वानखेडे सर,मुख्याध्यापक लोमटे सर,पतंगे सर,मुसळे सर,गायकवाड सर,भगत सर,अमोल सुरोशे

सर,बालाजी देशमुख सर, सुरोशे सर हजर होते यावेळी सरोज देशमुख यांनी आपले अध्यक्ष भाषणामध्ये राजश्री शाहू महाराजांच्या कार्यावर प्रकाश टाकला त्या म्हणाल्या बहुजन समाजाला शिक्षणाशिवाय तरोणपाय नाही, शाळा बरोबर वस्तीग्रह ची स्थापना करून सक्तीचे व मोफत शिक्षण दिले जे कोणी पालक शाळेत आपल्या मुला मुलींना टाकत नव्हते त्यांना १ रु . दंड म्हणून ते लावत होते शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये 50 टक्के आरक्षण दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल सुरोसे सर तर
आभार प्रदर्शन मुसळे सर यांनी मानले यावेळी वृक्षारोपण करण्यात आले