सामाजिक

अखेर त्या उपोषणाची यशस्वी सांगता

तात्काळ दखल घेतल्याबद्दल रिपब्लिकन सेनेच्या वतीने डी.एफ.ओंचे करण्यात आले स्वागत

शेख मुजाहिद

ससंपादक मो.7798306192

दिव्यांग शंकर हरकरे यांनी त्यांच्यावर झालेल्या अन्याय विरोधात गेल्या ९ दिवसापासून यवतमाळ येथील सी. सी. एफ. घुले यांच्या दालनासमोर उपोषणास सुरुवात करण्यात आली होती. त्यांच्या उपोषणास ९ दिवस होऊन सुद्धा वनविभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी त्यांच्या उपोषण मंडपास भेट देण्याचे सौजन्य दाखविले नव्हते.
सामाजिक बांधिलकी जपत दिव्यांग उपोषणकर्त्याला न्याय मिळवून देण्याकरिता दोन दिवसापूर्वी रिपब्लिकन सेनेच्या शिष्टमंडळाने उपोषणकर्त्याची भेट घेऊन सदर उपोषणास जाहीर पाठिंबा देत वन विभागाच्या भूमिकेचा निषेध नोंदविला व त्या अनुषंगाने पुसद उपवनविभागाचे डी.एफ.ओ स्वामी यांच्याशी सदर प्रकरणाची चौकशी करून येत्या २ दिवसात उपोषणकर्त्याला न्याय मिळवून देण्यासंदर्भात आग्रही भूमिका घेत जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी आंदोलन तसेच मोर्चे काढण्यात येतील असा गंभीर इशारा देण्यात आला होता.
याची दखल घेत ०२ दिवसांपूर्वी दिव्यांग उपोषणकर्ते यांना त्यांच्या चोरी गेलेल्या वाहनाच्या मोबदल्यात तीन लाख रुपये किमतीचे वाहन घेऊन देत तडजोडी अंती उपोषणाची यशस्वी सांगता करण्यात आली.
यावेळी रिपब्लिकन युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील चिंचोलकर, शहराध्यक्ष शुद्धोधन दिवेकर, तालुका अध्यक्ष गौतम नवसागरे, तालुका उपाध्यक्ष भीमराव खंदारे, तालुका सरचिटणीस साहेबराव कदम, मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, शहराध्यक्ष अँड अमीन बदनोरे व सदर प्रकरण सुरुवातीपासून हाताळणारे उमरखेड तालुका अध्यक्ष साजिद शेख ढाणकी व मनसैनिक तसेच काँग्रेस पक्षाच्या डॉ. प्रा मीनाक्षी सावळकर, विद्या पामाल, सरस्वती ठाकूर तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!