पुसद येथील जिजामाता कन्या शाळेच्या आवारातून अवैध रेती कारवाई मधील चोरीस गेलेला ट्रक व

आरोपीस अटक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ ची कारवाई
शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
दिनांक 12/01/2024 रोजी ट्रक क्रमांक MH-26-BE-2997 यामध्ये अवैध रेती वाहतुक करीत असतांना मिळून आल्याने तहसिल कार्यालय पुसद यांनी जप्ती पंचनामा करुन ट्रक क्रमांक MH-26-BE-2997 हा जिजामाता कन्या शाळा पुसद चे आवारात लावण्यात आला होता व ट्रक मालकांस विना परवाना अवैध रेती वाहतुकीच्या अनुषंगाने दंड आकारुन प्रकरणी दंड भरण्याबाबत आदेशित केले होते. असे असतांना यांतील अज्ञात आरोपी यांनी जप्त केलेल्या ट्रकला नवीन बेटरी लावून तो जिजामाता कन्या शाळेच्या आवारातून दिनांक 27/03/2024 रोजी चोरी करुन नेला असल्याचे दिसून आल्याने नायब तहसिलदार, तहसिल कार्यालय पुसद यांनी दिनांक 28/03/2024 रोजी पुसद शहर पोलीस स्टेशन येथे अज्ञ गत इसमा विरुध्द तक्रार दिल्याने दिलेल्या तक्रारी वरुन पोलीस स्टेशन पुसद शहर अप क्रमांक 173/2024 कलम 379 भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. गुन्हयातील अज्ञात आरोपी व चोरीस गेलेल्या ट्रकचा शोध घेण्याबाबत वरिष्ठांकडुन वेळोवेळी सुचना दिलेल्या होत्या.
दिनांक 31/03/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस स्टेशन पुसद शहर अप क्रमांक 173/2024 कलम 379 भादवि मधील अज्ञात आरोपीचा व चोरीस गेलेल्या मालाचा शोध घेत असतांना गोपनिय बाबतमीदारा मार्फत बातमी मिळाली कि, पुसद येथील विठठल बबनराव खडसे यांनी व त्याचे साथीदारांनी सदर गुन्हयातील ट्रक चोरी केलेला आहे अशी माहीती मिळाल्याने विठ्ठल बबनराव खडसे यांस ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्याने त्याचे साथीदार फारुख बेग इसार बेग, सय्यद अन्सार रा. पुसद यांनी जिजामाता कन्या शाळेत लावलेल्या ट्रकला नवीन बॅटरी लावून तेथून चोरी करुन तो ट्रक शेंबाळपिंप्री-कळमनुरी रोडवर मोकळया जागेत लावलेला असल्याचे सांगितल्याने सदरचा ट्रक शेंबाळपिंप्री-कळमनुरी रोडवरुन पोलीस स्टेशन पुसद शहर अप क्रमांक 173/2024 कलम 379 भादवि मध्ये जप्त करुन आरोपी विठठल बबनराव खडसे वय 35 वर्षे, रा.आर्दशनगर पुसद ता.पुसद जि. यवतमाळ यास व जप्त ट्रक किंमत 15,00,000 रु मुददेमालासह पुढील कारवाई करीता पोलीस स्टेशन पुसद शहर यांच्या ताब्यात दिले असुन पुढील तपास पो.स्टे. कडून सुरु आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक, यवतमाळ डॉ. श्री. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक श्री. पियुश जगताप, श्री. आधारसिंग सोनोने पो.नि. स्थागुशा यांचे मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक, गजाननग गजभारे, पोउपनिरी/शरद लोहकरे, चापोउपनि रेवन जागृत चापोउपनि रविंद्र श्रीरामे, पोहवा तेजाब रणखांब पोहवा सुभाष जाधव, पोहवा/ कुणाल मुंडोकार, पोहवा रमेश राठोड, पोशि/ मोहम्मद ताज, स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ, यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.