बँड बाजा लावून वसुली बंद करा :

मनसेची मुख्याधिकाऱ्याला निवेदनातून मागणी
शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
नगरपरिषदेकडून मालमत्ता कर व नळपट्टीचा कर भरणा करावा यासाठी संबंधित नागरिकांच्या घरासमोर बँड बाजा वाजविण्यात येत असून यातून संबंधित कुटुंबाची अवहेलना प्रशासनाकडून केली जात आहे असून विद्यार्थ्यांच्या परीक्षेवर, आजारी वृद्ध गोरगरीब नागरिकांच्या अवहेलना होत असल्यामुळे नगरपरिषदेनी बँड वाजून कर वसुली त्वरित बंद करण्याकरिता दि २२ मार्च रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले .
उमरखेड शहरातील मालमत्ता व नळाचा कराचा भरणा होऊन नगरपरिषदेचे उत्पन्न वाढीसाठी लकी ड्रॉ सारख्या योजना नगर परिषदेकडून राबविण्यात आल्या परंतु मागील दोन दिवसात खाली नागरिकांकडून बँड वाजून कर वसुली करीत असल्यामुळे शहरातील प्रत्येक वार्डात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा सुरू असून होणाऱ्या आवाजामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर तसेच परीक्षेवर त्याचे परिणाम व सामान्य करदात्यांवर होणारा हा त्रास तसेच प्रत्येक वार्डात वृद्ध, महिला व आजारी रुग्णांना या कर्कश आवाजामुळे मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहेत .त्यामुळे नगरपरिषद उमरखेड यांनी बँड वाजवून कर वसुली त्वरित बंद करावी करिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बँड वाजून वसुली बंद न केल्यास पुढील काही दिवसात नगरपरिषद कार्यालयासमोर बँड बजाव आंदोलन करण्यात येईल असा निवेदनातून इशाराही देण्यात आला यावेळी जिल्हा उपाध्यक्ष डेविड शहाणे, शहर अध्यक्ष संजय बिजोरे पाटील, संदीप कोकाटे ,अमोल लामटिळे विशाल कदम, आकाश ओझलवार , सचिन झाडे, मयूर वानखेडे ,सुनील भांडवले सह मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .