Uncategorized

पूर परिस्थिती आणि नेत्याची भूमिका…!


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे


दी. 16 व17 सकाळपासूनच महागाव, उमरखेड तालुक्यामध्ये पावसाने चांगलाच कहर केला आहे. आजूबाजूचे नदी नाले दुधडीन भरून वाहत आहेत. महागाव तालुक्यात धारमोहा येथील भगवान भेंडे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. तर वागद ईजरा येथील तुषार चव्हाण हा तरुण वाहून गेला होता नागरिकाच्या सतर्कतेने तो बचावला आहे.

पिकाचे मोठे नुकसान झाले आहे नदी नाल्याकाटचे शेत खरडून गेले त्यांच्या घरामध्ये पाणी घुसले आहे घरातील अन्नधान्याची नासाडी झालेली आहे अनेक कुटुंब उघड्यावर आले आहे. उमरखेड तालुक्यात चातारी सारख्या ठिकाणी गावात प्रचंड पाणी घुसले दुपारी दोन वाजता महागाव तालुक्यात पाऊस कोसळला अनेक रस्ते बंद झाले. ईसापुर धरणाचे तेरा गेट उघडे केले त्यामुळे नदी नाल्याला मोठा पूर आलेला आहे.

दोन्ही तालुक्यातील पूरग्रस्त नागरिकांच्या व्यथा जाणून घेण्याकरिता केवळ भाजपाचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा हे प्रत्यक्ष फिल्डवर हजर होते. त्यांनी अनेक ठिकाणी भेटी दिल्या लोकांना अशा परिस्थितीमध्ये धीर दिला मी माहिती घेतली असता प्रचंड पाऊस कोसळत असताना नितीन भुतडा आणि विद्यमान आमदार किसनराव वानखेडे यांच्या व्यतिरिक्त कोणताही पुढारी प्रत्यक्ष गाव खेड्यामध्ये फिरताना आढळून आलेला नाही. हल्ली लोकांच्या प्रति पुढार्‍यांच्या भावनाच मेल्या की काय, अशी परिस्थिती झाली आहे. नेतृत्व एका दिवशी घडत नसते त्यासाठी मेहनत जिद्द चिकाटी आवश्यक आहे. ती नितीन भुतडा यांच्यामध्ये दिसते आहे मागच्या वर्षी त्यांनीच महागाव तालुक्यात आनंदवाडी येथे पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी थेट मुख्यमंत्री यांच्याशी संपर्क करून हेलिकॉप्टर बोलवले होते. आजही त्यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करून आपण लोकांच्या सोबत असल्याचा परिचय दिलेला आहे.

नितीन भाऊ आपल्या जागृतपणामुळे कळत नकळत अनेकांना न्याय मिळतो आहे. पूर परिस्थिती बिकट आहे ही माहिती मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईल अशी प्रतिक्रिया नितीन भाऊंन दिली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button