मुळावा येथील हिंदू मोक्षधाम भूमीचा विकास कधी

शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
उमरखेड तालुक्यातील मुळावा या गावांमधील हिंदू मोक्षधाम अनेक समस्येच्या विळख्यातअडकली आहे. या नियोजित जागेमध्ये झाडे झुडपे वाढली असून साधे उभे राहण्यासाठी जागा देखील नाही. गावामधून येणारी अंतयात्रा ही जवळपास एक ते दीड किलोमीटर अंतरावरून येते. या ठिकाणी आल्यावर बसण्यासाठी जागा देखील नाही. तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला 15व्या वित्त आयोगानुसार 45 टक्के निधी हा विकास कामासाठी मिळत असतो. तर मग मुळावा ग्रामपंचायतीचा निधी गेला कुठे मुळावा ग्रामपंचायतीने हा निधी मंजूर करून घेतला नाही का जर घेतला तर विकास का नाही झाला. असा जनतेला प्रश्न पडला आहे. ग्रामपंचायत पाण्याचे टाकी मोक्षधाम लगत असून देखील. मोक्षधाम मध्ये कोणतीही पाण्याची व्यवस्था नाही. पाणी उशाला व कोरड मड्याच्या घशाला अशी दयनीय दशा मुळावा येथील हिंदू मोक्षधाम भूमीची झाली आहे. ग्रामपंचायत या गंभीर प्रश्नाकडे लक्ष घालते का.