Uncategorized

काँग्रेसचे खासदारांना विविध मागण्यांचे निवेदन


शेख मुजाहिद

ससंपादक मो.7798306192


तालुक्यात शेतकऱ्यांवरील निर्माण झालेल्या संकटात शासकीय मदत मिळवून देण्याबाबत, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होणाऱ्या कामांबाबत,उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील समस्सेबाबत, वीज वितरण विभागातील समस्सेबाबत, जिल्हा परिषद व पंचायत समिती मार्फत राबवणाऱ्या विविध योजनातील समस्यांबाबत, काँग्रेस पक्षाकडून झालेल्या आढावा बैठकीत, खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना निवेदन देण्यात आले.

चालू खरीप हंगामामध्ये 65 मिमी पेक्षा जास्त पाऊस झाल्याने, सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी. तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा. अर्धवट डाव्या कालव्यामुळे 5 टक्के पाणी आरक्षित करून, पैनगंगा नदी पात्रात पाळीनुसार सोडण्यात यावे. अतिवृष्टीमुळे खरडून गेलेले रस्ते व पूल यांची नुकसान भरपाई देणे यावे. अतिवृष्टीमुळे बाधित शेताचा सर्वे करून, एकरी 50 हजार रुपये मदत द्यावी. शेतातील विहिरीचे झालेले नुकसान भरपाई करून देण्यात यावे. शेतकऱ्यांचे विद्युत पंप, पाईप, अवजारे तसेच वाहून गेलेले जनावराबाबत नुकसान भरपाई देण्यात यावी. महापुराने झालेल्या घरांची नुकसान भरपाई देण्यात यावी. शेतमजुरांना रोजगार हमी योजनेतून कामे देऊन आपातकालीन वेळेतील कामाचा मोबदला देण्यात यावा.

सार्वजनिक बांधकाम विभागा बाबत तालुक्यातील विडूळ-देवसरी रस्ता बांधकाम करून देण्यात यावा. सदर रस्त्यावर पुराचे पाणी येत असल्याने पुलाची उंची वाढवून द्यावी. खरुस गावालगत असलेल्या नाल्यावर दोन मीटर उंच पुलाचे काम करून, 200 मीटरचा रस्ता करून देण्यात यावा. देवसरी रस्त्यावरील उधळलेले बाभळीचे झाडे तोडण्यात यावे. खरुस-ब्राह्मणगाव रस्ता उंचवडपर्यंत 1.200 किमी वाढवून देण्यात यावा. कारखेड चातारी हरदडा रस्त्यावरील दिघडी फाट्या जवळील, पुलाची उंची वाढून देण्यात यावी. ढाणकी, बिटरगाव, जेवली, सोनदाबी, सहस्त्रकुंड रस्त्यावरील पूलांची उंची वाढून देण्यात यावी. ढाणकी-बिटरगाव रस्त्यावरील दोन बंधाऱ्यापैकी एक बंधारा तोडून, वाहतूक सुरळीत करण्यात यावी. पैनगंगा नदीवरील प्रमा मान्यता असलेले, कारखेड व उमरखेड-धोतरा पुलाचे काम लवकर सुरू करण्यात यावे. चालगणी गुरफळी टाकळी, विडूळ रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेत घेण्यात यावा.

उर्दू पैनगंगा प्रकल्पाच्या डावा कालव्याचे अर्धवट काम पूर्ण करून, कॉंक्रिटीकरण करण्यात यावे. तसेच मुख्य कालवा एक किलोमीटर असतारीकरण करण्यात यावा. साखरा, खरूस, लोहरा, कारखेड, देवसरी या भागात डावा कालव्याचे काम अपूर्ण असल्याने, त्यांच्या हिश्याचे 5 टक्के पाणी पैनगंगा नदी पात्रात सोडण्यात यावे. सीबीएससी कालवा खरुस, परजना, ब्राह्मणगाव रस्त्यावरील खराब झालेल्या पुलाचे बांधकाम करण्यात यावे.

वीज वितरण ढाणकी उपविभागातील साखरा सब स्टेशन अंतर्गत येणाऱ्या, चालगणी, साखरा, खरुस, लोहरा, कारखेड, देवसरी, दिघडी, उंचवडद गावातील कमजोर एलटी लाईन बदलून देण्यात यावी. पैनगंगा नदी काठावरील उर्ध्व पैनगंगेच्या , डावा कालवा सिंचन भागातील नवीन सबस्टेशन मंजूर करून, नवीन 20 ते 25 डीपी मंजूर करून देण्यात यावी. साखरा सब स्टेशनला कायमस्वरूपी इंजिनियर देण्यात यावा. स्वतंत्र गावठाण फिडरचे काम सुरू करण्यात यावे.

उमरखेड पंचायत समिती अंतर्गत जल जीवन मिशन चे अर्धवट कामे संबंधित ठेकेदारांना सूचना देऊन पूर्ण करण्यात यावे. जलजीवन च्या कॉन्ट्रॅक्टीकरण, मुख्य रस्त्यातून पाईपलाईन जोडणी, नवीन ट्रान्सफॉर्मर ही अर्धवट कामे पूर्ण करण्यात यावी. अतिक्रमित जागेवरील घरकुल लाभार्थ्यांना 8 अ देऊन बांधकाम करण्याची परवानगी द्यावी. अशा विविध विभागातील तालुक्यातील जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांबाबत, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दत्तराव शिंदे यांनी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना, वरील कामन बाबत निवेदन दिले. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासनाने सदर मागण्यांची तात्काळ दखल घेऊन, कामे तात्काळ पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!