सुकळी (ज ) येथील रास्तभाव दुकानात धान्याची अफरातफर

शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
स्वस्त धान्य दुकानातील धान्य शिधापत्रिका धारकांना न वाटप करता धान्याची अफरातफर करणाऱ्या तालुक्यातील सुकळी (ज ) येथील स्वस्त धान्य दुकानदारा विरोधात दोन लाख 55 हजार 233 रुपये शासन जमा करून रास्त भाव धान्य दुकानाचे प्राधिकार पत्र रद्द करण्यासाठी येथील तहसीलदार यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यवतमाळ यांना अहवाल सादर केल्याने या रास्त भाव धान्य दुकानदारावर काय कारवाई होते याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे .
सुकळी (ज ) येथील रास्त भाव धान्य दुकानच्या वाटपामध्ये होत असलेल्या अनियमिततेच्या अनुषंगाने निरीक्षण अधिकारी पुसद व पुरवठा निरीक्षक उमरखेड यांनी सुकळी (ज) येथील दुकानात जोडण्यात आलेल्या शिधापत्रिकाधारक यांची चौकशी केली . तब्बल 49 शिधापत्रिकाधारकांचे बयान नोंदविण्यात आले . यावेळी12 मार्च 2024 रोजी तपासणीत आढळून आलेल्या धान्य साठ्याच्या ताळमेळ चौकशी अधिकाऱ्यांनी घेतला असता रास्त भाव धान्य दुकानात गव्हु 21 . 81 क्विंटल तर 47 .43 क्विंटल तांदूळ धान्यसाठा कमी आढळून आला .तांदूळ ,गव्हूच नव्हे तर रवा,मैदा, पोहा ,पामतेल ,चणाडाळ ,साखर इत्यादी धान्यही तपासणी दरम्यान कमी आढळून आले या सर्व धान्यसाठ्याची बाजार भाव प्रमाणे रक्कम ही शासन जमा करणे आवश्यक असल्याचे सांगूनदोन लाख 55 हजार 233 रुपये शाखा शासन जमा करून स्वस्त धान्य दुकानधारक श्रीमती एस .डी .वानखेडे यांचे रास्त भाव धान्य दुकानाचे प्राधिकार पत्र रद्द करण्यासाठी अहवाल हा जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आलेला आहे .एवढेच नव्हे तर या रास्तभाव दुकानाची चौकशी झाली असता शिधापत्रिका धारकांना ऑनलाईन नुसार धान्य विक्रीत न करणे , धान्य वाटपाची पावती शिधापत्रिका धारकांना न देणे , ऑनलाईन वाटप नुसार साठा नोंदवही अज्ञात अद्यावत न ठेवणे ,रास्तभाव दुकानावर साठा फलक अद्यावत न ठेवणे , आनंदाचा शिधा लाभार्थ्यांना उशिरा वाटप करणे आदी दोष आढळून आल्याने सदर दुकानाचे प्राधिकरण पत्र रद्द करण्यात यावे असा अहवाल तहसीलदार आर . यु . सुरडकर यांनी दिनांक28 मे 2024 रोजी सादर केला आहे .त्यामुळे या दुकानावर काय कार्य होते याकडे तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेचे लक्ष लागले आहे .
चौकट :
विशेष म्हणजे यापूर्वी हेच दुकान चार वेळा निलंबित करण्यात आले होते तर दोन वेळा रद्द करण्यात आले होते एक वेळेस इसी ॲक्ट नुसार गुन्हाही नोंद करण्यात आला होता . त्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार काय कारवाई करणार हे सुद्धा औचीत्याचे ठरणार आहे .