Uncategorized

दोन तांदळाचे संसयास्पद ट्रक पोलिसांच्या ताब्यात .

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई .

शेख मुजाहिद

सहसंपादक मो.7798306192

नांदेड ,अहमदपूर या ठीकाणावरून येणारे दोन संसयास्पद तांदळाचे ट्रक आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखा पुसद टीम यांनी नागपूर तुळजापूर महामार्गावरील नांदेड रोड व नागेशवाडी फाट्याजवळ पकडल्याने खळबळ उडाली आहे .दोन्हीही ट्रक मधील तांदूळ राशनचे आहे की खाजगी आहे याबद्दल अद्यापही माहिती मिळाली नसून ट्रक मधील तांदूळ तपासणीसाठी अन्न पुरवठा विभाग यांच्याकडे पाठवण्यात आले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले .
मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हा शाखा यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून अहमदपूर व नांदेड वरून गोंदिया कडे जात असलेले दोन ट्रक आज सकाळी नागपूर तुळजापूर रोडवरील नागेशवाडी फाट्याजवळ पकडून जप्त करण्यात आले आहे सदर जप्त केला गोंदिया जाणारा ट्रक क्रमांक एम एच २६ बी इ 9282 तसेच नांदेड ते गोंदिया जाणारा ट्रक क्रमांक एमएच 26 ए डी 2083 हे तांदूळाचे कट्टे भरून असल्याची गुप्त माहिती पुसद गुन्हे अन्वेषण विभागाला मिळतात त्यांनी नाकाबंदी करून पकडले असता त्यामध्ये राशनचा तांदूळ दुसऱ्या पोत्यामध्ये बदलून असल्याने पोलिसांनी त्यांना विचारणा केली असता संशयास्पद उत्तरे दिल्यामुळे त्यांनी दोन्ही ट्रक उमरखेड पोलीस स्टेशनला जमा केले असून पुढील चौकशी पुरवठा विभागाचे अधिकारी तसेच उमरखेड पोलीस करत आहे.
ही कारवाई पुसद स्थानीक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक गजानन गजभारे तसेच पीएसआय अमोल राठोड यांनी केली आहे.

चौकट ।

नांदेड व अहमदनगर येथील दोन तांदळाचे संसयास्पद ट्रक पोलिसांनी पकडले असून सदर ट्रकमध्ये खाजगी की राशन चा तांदूळ आहे याबद्दल पाहणी करण्याकरिता अन्न व पुरवठा विभागाकडे पाठवले असून सदर विभागाकडून अद्यापही अहवाल आले नसून अहवाल प्राप्त होताच कारवाई करण्यात येईल . .

पोलीस निरीक्षक
शंकर पांचाळ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!