हिमायत नगरच्या रस्त्यांवर दारूचा नंगानाच; दुचाकी आणि चारचाकी बनल्या ‘चालते-फिरते बार’, पोलिसांच्या

प्रतिनिधि शेख खयुम खूरेशी
हप्तेखोरीचाकळस!
हिमायत नगर: शहरात कायद्याचा धाक पूर्णपणे संपुष्टात आला असून, खाकी वर्दीच्या मेहरबानीने अवैध दारूचा व्यापार आता हायटेक झाला आहे. दुचाकीच्या डिक्या असोत वा आलिशान चारचाकी गाड्या, या वाहनांचा वापर आता प्रवासासाठी नाही तर चक्क गावठी दारूच्या छुप्या वाहतुकीसाठी केला जात आहे. विशेष म्हणजे, पोलिसांच्या नाकाबंदीतून या गाड्या एखाद्या ‘व्हीआयपी’ ताफ्याप्रमाणे विनासायास पार पडतात, कारण या व्यापाराला पोलिसांच्या वरदहस्ताचे अभेद्य कवचलाभलेआहे.
अवैध व्यापाराचे विदारकवास्तव:
वाहनांतून विषाची विक्री: दुचाकीस्वार डिलिव्हरी बॉयप्रमाणे गल्लोगल्ली दारू पोहोचवत आहेत, तर चारचाकी गाड्यांमधून मोठ्या प्रमाणात साठा शहरात उतरवला जात आहे.
हप्तेखोरीचे ‘इंजिन’: सूत्रांच्या माहितीनुसार, प्रत्येक गाडीचा महिन्याचा ‘हप्ता’ पोलीस ठाण्यात आधीच जमा होतो. म्हणूनच पोलीस कर्मचारी या गाड्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात.
नागरिकांचा रोष: भररस्त्यात वाहने उभी करून होणाऱ्या या व्यवहारामुळे महिला आणि शाळकरी मुलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.
”जेव्हा रक्षकच हप्त्यापोटी गुन्हेगारांचे सारथी बनतात, तेव्हा सामान्य जनतेने कोणाकडे दाद मागावी? हिमायत नगर पोलीस आता ‘खाकी’चे कर्तव्य विसरून माफियांचे व्यवस्थापक झाले आहेत.”



