Uncategorized

शहरात फेरीवाले, बैठे व्यावसायिकांना छत्री वाटप

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड शहरात भारतीय जनता पक्षाच्यावतीनेनितीन भुतडा यांच्या संकल्पनेतून गरजू किरकोळ व्यावसायिकांना छत्री वितरण उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये शहरातील फेरीवाले, गाडेवाले व बैठे व्यवसायिकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांचे आयोजन भाजपा यवतमाळ, पुसद जिल्हा समन्वयक नितीनभाऊ भुतडा मित्रमंडळाच्यावतीने करण्यात आले. शहरातील मुख्य बाजारपेठेतील शेकडो फेरीवाल्यांना, हातगाडी व बैठे व्यवसायिकांना या छत्र्यांचा लाभ वर्तमान स्थितीतील पावसाळ्यात मिळाला. या छत्र्या त्यांच्या रोजच्या उपजीविकेच्या कामात ऊन, पाऊसापासुन रक्षण करतील, अशी, भावना यावेळी भाजपा नेते नितीन भुतडा यांनी व्यक्त केली. लाभार्थ्यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले व संयोजकांचे आभार मानले. यावेळी आ. किसनराव वानखेडे, जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, माजी आमदार नामदेवराव ससाने, माजी आ. विजयराव खडसे, जिल्हा सरचिटणीस महेश काळेश्वरकर, बळवंतराव नाईक, अॅड अनिल माने, भाजपा ग्रामीण मंडळ अध्यक्ष विठ्ठल वानखेडे, पुंडलिक कुबडे, अॅड जितेंद्र पवार, माजी नगर उपाध्यक्ष अरविंद भोयर, शहराध्यक्ष अतुल खंदारे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष पवन मेंढे, अमोल तीवरंगकर, महावीर महाजन, किशोर तिवारी, बाळा दुधेवार, संतोष लुटे, गजानन जगताप, कृष्णा साबळे आदींसह शेकडो लाभार्थी, असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button