सामाजिक

उमरखेड येथे बौद्ध बांधवांकडून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत

सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ) मो.9823995466

उमरखेड (दि. 7 डिसेंबर) मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे यासाठी मागील अनेक दिवसांपासून मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे उमरखेड येथे आले असता त्यांनी भारतीय राज्यघटने शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले।

त्यानंतर जरांगे पाटील यांचे बौद्ध बांधवांच्या वतीने शाल व पुष्पहार घालून उमरखेड नगरीत स्वागत करण्यात आले.

गो.सी गावंडे महाविद्यालय पटांगण येथे जरांगे पाटील यांची जाहीर सभा होती.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका महासचिव देवानंद पाईकराव, भीम टायगर सेनेचे शहराध्यक्ष सिद्धार्थ दिवेकर, सामाजिक कार्यकर्ते प्रफुल दिवेकर,शंकर सुळ, निशांत मनवर, बुद्धभूषण इंगोले, बबलू भालेराव, शाम धुळे,अंबादास धुळे इत्यादी अनेक बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!