सामाजिक

महापरिनिर्वाण दिनानिमित्त ढाणकी येथे गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप

सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ) मो.9823995466

ढाणकी (दि.6 डिसेंबर) भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गरीब व गरजू विद्यार्थ्यांना दिनांक 6 डिसेंबर रोजी ढाणकी येथे स्वेटरचे वाटप करून भीम सैनिकांनी महामानवांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले.

कडकडत्या थंडीत उघड्यावर संसार थाटून आपल्या पोटाची खळगी भरणाऱ्या घिसडी समाजातील लहान बालकांना तसेच जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना येथील भीम सैनिक जॉन्टी भाऊ विनकरे , गोलू भाऊ मुनेश्र्वर,समाधान दादा राऊत, धम्मपाल गायकवाड, राहुल भालेराव, यांनी स्वेटरचे वाटप करून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!