बिटरगाव ठाणेदार सुजाता बनसोड यांची ताबडतोब बदली करा,,,

( ढाणकी येथून सर्वपक्षीय दिलेल्या निवेदनाला वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा )
शेख इरफान
मुख्य संपादक मो.9021233696
बिटरगाव ( बु ) येथील पोलीस स्टेशनच्या ठाणेदार सुजाता बनसोड यांच्या गैरवर्तुनीकीला कंटाळून ढाणकी येथील सर्व पक्ष एकत्रित येऊन ठाणेदाराच्या बदलीची मागणी केली होती. तरीही कोन्हालाही न घाबरता वरळी मटका, रेती, मुरूम, गुठाखा, देशी दारू, विदेशी दारू विक्री आजही सुरु आहे. त्यामुळे गावकऱ्यासह महिला सुद्धा त्रस्थित झाल्या आहेत. ठाणेदार सुजाता बनसोड हया मागासवर्गीय अनुसूचित जातीच्या असल्यामुळे राजकीय लोक

त्यांच्याविरुद्ध षडयंत्र करीत आहेत. असे ठाणेदार मॅडमचे पतीदेव रवी जाधव काही अनुसूचित जातीच्या लोकांना सांगत आहेत. त्यामुळे जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण कोणताही अवैध धंदा सुरू करायचा असेल तर रवी जाधव त्यांना महिना ठरवतात व ठाणेदार मॅडम परमिशन देतात. आशा यांच्या दुहेरी आप मतलबीपणामुळे व स्वतःच्या स्वार्थासाठी रवी जाधव जातीय तेढ निर्माण करताना दिसत आहेत. त्यामुळे जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून रक्तरंजित जातीय दंगल घडविण्याच्या बेतात आहेत. म्हणून पोलीस कर्तव्याला विसरून जनतेची लूट करणाऱ्या ठाणेदाराची ताबडतोब बदली करून बिटरगाव पोलीस

स्टेशन येथे कर्तव्यशील ठाणेदार द्यावा. यासाठी वंचित बहुजन आघाडी ने जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. व निवेदनामार्फत अशी मागणी केली आहे कि रवी जाधव यांच्या नातेवाईकांच्या आमदनीची कसून चौकशी करण्यात यावी. कारण हा पैसा सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांचा आहे. व रवी जाधव यांच्या सुद्धा संपूर्ण प्रॉपर्टी ची पडताळणी करून दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. अन्यथा सर्व पक्षासह वंचित बहुजन आघाडी सुद्धा संविधानिक मार्गाने तीव्र आंदोलन करणार आहे. निवेदन देताना उपस्थित. जिल्हा सचिव जॉन्टी भाऊ विनकरे, मोहन गायकवाड, सुनील राऊत, गोलू मुनेश्वर हे उपस्थित होते.
