Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
Uncategorizedशहर

उमरखेडमध्ये कर्णकर्कश फटाक्यांवर बंदीची मागणी; संयुक्त पत्रकार संघ आक्रमक!

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

सुतळी बॉम्ब, अॅटम बॉम्ब व हजारो फटाक्यांच्या लडींवर निर्बंध घालण्याची मागणी; प्रशासनाला निवेदन

उमरखेड,आगामी दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर उमरखेड शहर व तालुक्यात कर्णकर्कश आवाज करणाऱ्या फटाक्यांच्या विक्री व वापरावर नियंत्रण आणून नियमबाह्य फटाक्यांवर कारवाई करावी, अशी मागणी संयुक्त पत्रकार संघ, उमरखेडच्या वतीने करण्यात आली. दिनांक १२ ऑक्टोबर २०२६ रोजी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगर परिषद मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
उमरखेड येथे २६ सप्टेंबर रोजी झालेल्या स्फोटातील पाच नागरिकांचा मृत्यू आणि हिंगोलीतील फटाक्यांच्या गोदामाला लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनांचा संदर्भ देत, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले.
शहरात हजारो फटाक्यांच्या लडी फोडल्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, हृदयरुग्ण आणि आजारी व्यक्तींना त्रास होतो. तसेच ध्वनी व वायुप्रदूषणासह आग लागण्याचा धोकाही निर्माण होतो, असे निवेदनात नमूद आहे. फटाके विक्री परवान्यांची तपासणी, अग्निसुरक्षा नियमांची अंमलबजावणी आणि नियमबाह्य फटाक्यांच्या विक्रीवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
नगर परिषदेने दवंडी, पोलीस पाटील तसेच शाळा-महाविद्यालयांच्या माध्यमातून जनजागृती करावी, अशीही मागणी आहे. “दीपावली हा प्रकाशाचा सण आहे, आवाजाचा नाही!” असा संदेश देत, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष कार्यवाही करावी, अशी भूमिका संयुक्त पत्रकार संघाने मांडली.

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button