काँग्रेसला संजीवनी देणारे साहेबराव कांबळे आता शिंदे गटात सक्रिय!

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव : उमरखेड-महागाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी प्रयत्न करणारे साहेबराव कांबळे विधानसभा निवडणुकीत अल्प मतांच्या फरकाने पराभूत झाले. पक्षातील काही जवळच्या कार्यकर्त्यांकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याची खंत व्यक्त करत त्यांनी पुढील राजकीय वाटचालीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी ऐनवेळी माघार घेतली आणि त्यानंतरच्या राजकीय घडामोडींमध्ये शिवसेनेचे चतुर्वेदी यांच्या विजयासाठी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगितले जाते. सध्या कांबळे उमरखेड-महागाव मतदारसंघात गावोगावी दौरे करून शिवसेनेची संघटनात्मक बांधणी, नवीन शाखांची स्थापना आणि जुन्या शिवसैनिकांना पुन्हा सक्रिय करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. नुकतीच त्यांनी कासारबेळ येथे नंदू मस्के यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांचे मामा तथा माजी पंचायत समिती सदस्य मोहनराव करे आणि मित्रमंडळी उपस्थित होते. या भेटीदरम्यान त्यांनी आपल्या राजकीय प्रवासातील अडचणी आणि आगामी संघटनात्मक कामकाजाबाबत चर्चा केली. काँग्रेसला उभारी देण्यासाठी प्रयत्न करणारे कांबळे आता शिंदे गटात शिवसेनेची ताकद वाढविण्यासाठी सक्रिय झाल्याने त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. कासाळबेळ येथे नंदू मस्के यांच्या घरी भेट देऊन त्यांना शिवसेनेमध्ये घेण्यात आले त्यावेळेस त्यांचे मामा माजी पंचायत समिती सदस्य मोहनराव करे सुद्धा उपस्थित होते व इतरही मित्र मंडळ शिवसेनेच्या वाटेवर दिसत आहे आगामी काळात पक्षश्रेष्ठी त्यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवतात आणि त्यांच्या जनसंपर्काचे संघटनात्मक ताकदीत कितपत रूपांतर होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



