सामाजिक
निंगनूर ग्रामपंचायत येथे आज दिनांक 26/11/2023रोज रविवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून भारतीय संविधान दिवस साजरा केला

ग्रामीण प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड
मो.7875525877
आज दि.26/11/2023.रोज रविवार ला ग्रामपंचायत कार्यालय निंगनूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून भारतीय संविधान दिवस साजरा करण्यात आला. यावेळी निंगनूर ग्रामपंचायत चे सरपंच श्री.सुरेश बरडे , ग्रामपंचायत सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री.सुनिल बरडे,, जानी खान,श्री.प्रकाश माधवराव अडकीने , ग्रामपंचायत चे कर्मचारी पांडुरंग महाले व तलाठी कर्मच्यारी कोतवाल संतोष जाधव व पत्रकार विलास राठोड यांच्या उपस्थित मध्ये हा भारतीय संविधान दिवस साजरा करण्यात आले
