Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
Uncategorized

पोठा येथे रस्त्याच्या मधे मुलगा आल्याने बालकाला वाचवताना सिमेंटचा ट्रक नाल्यात कोसळला; चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी: शेख खय्यूम):
हिमायतनगर तालुक्यातील पोठा गाव येथे रस्त्याच्या मधे अचानक एक लहान मुलगा आल्यामुळे त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात सिमेंट भरलेला ट्रक अनियंत्रित होऊन रस्त्यालगतच्या नाल्यात कोसळल्याची घटना घडली आहे. ट्रकचालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे बालकाचे प्राण वाचले असून मोठा अनर्थ टळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिमायतनगर तालुक्यातील पोठा गावाजवळ रस्त्याच्या मधेच अचानक एक लहान मुलगा चालका समोर आला. त्या बालकाला वाचवण्यासाठी ट्रकचालकाने क्षणाचाही विलंब न करता गाडीचे स्टेअरिंग तातडीने बाजूला वळवून ट्रक थेट नाल्यात उतरवला. यामुळे मालवाहू ट्रक रस्त्यावरून घसरून बाजूच्या खोल नाल्यात शिरला आणि अपघातात ट्रकच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले.
सुदैवाने चालकाच्या सतर्कतेमुळे चिमुकल्याचा जीव वाचला असून घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button