Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
महागावशहर

महागावच्या प्रभाग क्रमांक १४ मध्ये मद्यधुंद व्यक्तीचा धिंगाणा!
महिलेशी गैरवर्तनाचा आरोप; संतप्त नागरिकांनी पकडून केली मारहाण, पोलिसांच्या तत्परतेवर प्रश्नचिन्ह

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव : शहरातील प्रभाग क्रमांक १४ मधील दत्त मंदिर रोडवर शनिवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास एका कथित मद्यधुंद अनोळखी व्यक्तीने धिंगाणा घातल्याची घटना घडली. या व्यक्तीने महिलेशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असून, नागरिकांनी त्याला पकडून मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती दारूच्या नशेत परिसरात गोंधळ घालत होती. यावेळी महिलेशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न झाल्याने नागरिक संतप्त झाले. त्यांनी संबंधित व्यक्तीला पकडून चोप दिला. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती नागरिकांनी महागाव पोलीस ठाण्याचे एपीआय मुटकुळे यांना फोनद्वारे दिल्याचे सांगण्यात येते. मात्र, माहिती देऊनही घटनास्थळी पोलिसांची मदत वेळेत मिळाली का, याबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांकडून तातडीने मदत मिळणे आवश्यक असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
दरम्यान, पकडण्यात आलेली व्यक्ती नेमकी कोण आहे, ती चोरीच्या उद्देशाने परिसरात फिरत होती का, तसेच महिलेशी गैरवर्तनाच्या आरोपात कितपत तथ्य आहे, याची अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी करून संबंधित व्यक्तीची ओळख पटवावी आणि घटनेतील वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची तातडीची मदत, तसेच अशा घटनांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याची गरज या घटनेच्या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. आरोपीला पकडून कारवाई करतील का

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button