दुष्काळात बोगस बियाण्यांचा फटका; शेतकऱ्यांच्या नुकसानीला जबाबदार कोण?

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर सध्या दुहेरी संकट उभे आहे. एका बाजूला पावसाच्या अनियमिततेमुळे पिकांचे नुकसान झाले, तर दुसऱ्या बाजूला बियाण्यांची उगवणक्षमता कमी असल्याच्या तक्रारींमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे उत्पादन घटले, तर त्याची जबाबदारी नेमकी कोणाची, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महागाव तालुका कृषी विभागाने ३० कृषी सेवा केंद्रांतून घेतलेल्या ३१ बियाणे नमुन्यांपैकी सोयाबीनचे आठ नमुने उगवणक्षमतेच्या चाचणीत अप्रमाणित ठरल्याचे नमूद आहे. संबंधित कंपन्यांविरुद्ध कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचेही कृषी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. न्यायालय मध्ये खटले दाखल केल्याचे कृषी अधिकारी चेके यांनी सांगितले आहे.
मात्र, या पार्श्वभूमीवर केवळ बियाणे विक्रेत्यांवर कारवाई करून प्रश्न संपणार नाही. शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष नुकसानीची जबाबदारी निश्चित करणे आणि त्यांना भरपाई मिळवून देणे महत्त्वाचे आहे.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



