Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
Uncategorizedशहर

आमदार बाबूराव कदम कोहळीकरांच्या प्रयत्नांना यश; हिमायतनगरमधील २५,२९४ शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा!

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

हिमायतनगर (प्रतिनिधी शेख खय्यूम) :
हिमायतनगर व हदगाव तालुक्यातील खरीप हंगाम २०२३-२४ च्या थकीत पीक विम्यासाठी आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश आले आहे. या निर्णयामुळे हिमायतनगर परिसरातील तब्बल २५ हजार २९४ शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, पीक विम्याचा लाभ मिळण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे, अशी माहिती आमदार कोहळीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शेतकऱ्यांनी पुकारलेल्या उपोषणानंतर आमदार कोहळीकर यांनी तत्परतेने पावले उचलत तत्कालीन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची भेट घेऊन हा गंभीर प्रश्न मांडला होता. त्यानंतर ४ जून २०२५ च्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांसोबत शेतकऱ्यांची भक्कम बाजू मांडण्यात आली, तसेच २८ ऑक्टोबर २०२५ रोजी मंत्रालयात कृषी सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्या उपस्थितीत विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीस विवेक देशमुख, हनुमान राजे गोरे, प्रल्हाद पाटील हडसणीकर व पंजाबराव देशमुख उपस्थित होते.
पुढील टप्प्यात कृषी सचिव परिमल सिंह यांच्या पुढाकारातून २१ सप्टेंबर २०२६ रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातून ऑनलाइन बैठक पार पडली. या बैठकीत माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण, आमदार श्रीजयाताई चव्हाण, जिल्हाधिकारी राहुल कार्डिले, जिल्हा कृषी अधीक्षक दत्तकुमार कलशेट्टी, नीलेश देशमुख, संदीपकुमार देशमुख आणि विमा कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या प्रश्नासाठी उपोषणकर्ते प्रल्हाद पाटील हडसणीकर यांनीही सातत्याने पाठपुरावा केला होता. प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात प्रत्यक्ष पीक विम्याची रक्कम जमा होईपर्यंत हा पाठपुरावा असाच सुरू राहील, अशी ग्वाही आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांनी दिली आहे.

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button