Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
Uncategorized

अतिवृष्टी अन् पाणीटंचाईने ग्रासलेला शेतकरी पुन्हा अडचणीत; सोनारीत शॉर्टसर्किटने ३ एकर ऊस जळून ५ लाखांची राख!

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम):
एकिकडे पावसाने मारलेली ताण, तर दुसरीकडे विहिरी अन् बोअरवेल कोरड्या पडल्यामुळे शेतकरी आधीच भीषण पाणीटंचाई आणि अस्मानी संकटाचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत सोनारी येथे शेतातून गेलेल्या उच्चदाब वीजवाहिनीच्या तारांमध्ये अचानक झालेल्या भीषण शॉर्टसर्किटने ३ एकर उभा ऊस जळून खाक झाला असून, यात शेतकऱ्याचे सुमारे ५ लाख रुपयांचे अपरिमित नुकसान झाले आहे.
पाण्याच्या अभावाने कसाबसा पीक वाचवण्यासाठी जिवाचा आकांत करणाऱ्या बळीराजाच्या तोंडाशी आलेला घास महावितरणच्या कारभारामुळे हिरावला गेला आहे. ऐन निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यावर कोसळलेल्या या संकटामुळे तीव्र संताप व्यक्त होत असून, महावितरण व महसूल प्रशासनाने त्वरित घटनास्थळाचा पंचनामा करून पीडित शेतकऱ्याला तात्काळ आर्थिक भरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button