नवाबखान युसुफखान पठाण यांना ASI पदी पदोन्नती; पी.आय. लक्ष्मण केंद्रे यांच्या शुभहस्ते खांद्यावर लावले स्टार!

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम):
नांदेड जिल्हा पोलीस दलात आपल्या कर्तव्यनिष्ठेने व उत्कृष्ट सेवेने वेगळी ओळख निर्माण करणारे पोलीस हवालदार नवाबखान युसुफखान पठाण (बक्कल क्रमांक २२८४) यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) पदी पदोन्नती मिळाली आहे. या पदोन्नतीमुळे हिमायतनगर पोलीस ठाण्यासह संपूर्ण पोलीस वर्तुळात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून पदोन्नतीचे अधिकृत आदेश प्राप्त होताच, हिमायतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (PI) लक्ष्मण केंद्रे यांच्या शुभहस्ते नवाबखान युसुफखान पठाण यांच्या खांद्यावर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदाचे स्टार (शोल्डर बॅज) लावून त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. याप्रसंगी पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी नवाबखान पठाण यांच्या आजवरच्या उत्कृष्ट सेवेचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी उदंड शुभेच्छा दिल्या.
दीर्घकालीन प्रामाणिक सेवा आणि कर्तव्यदक्षतेचे फलित म्हणून मिळालेल्या या पदोन्नतीबद्दल नवाबखान युसुफखान पठाण यांच्यावर सर्व पोलीस सहकारी, वरिष्ठ अधिकारी आणि तालुक्यातील नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



