हिमायतनगरच्या दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी आमदार बाबुराव कदम कोहळीकरांचा आरोग्य शिबिरातून आधार
पाच ते सात हजारांहून अधिक रुग्णांचा सहभाग; दुष्काळाच्या काळात आरोग्यसेवेचा दिलासा —

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
शंभरहून अधिक जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा घेणार
हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम):
तालुक्यात यंदा निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे बळीराजा आर्थिक व मानसिक संकटात सापडला आहे. अशा कठीण प्रसंगी दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना धीर देण्यासाठी आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या वतीने हिमायतनगर शहरात भव्य मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, परिसरातील पाच ते सात हजारांहून अधिक रुग्णांनी या आरोग्यसेवेचा प्रत्यक्ष लाभ घेतला.
यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडून रुग्णांची मोफत तपासणी करून आवश्यक औषधोपचार पुरवण्यात आले. केवळ आरोग्याची काळजी घेऊन न थांबता, दुष्काळाच्या काळात शेतकरी कुटुंबांवरील लग्नसराईचा मोठा आर्थिक भार हलका करण्यासाठी आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी आणखी एक महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला असून, येत्या काळात तालुक्यातील शंभरहून अधिक गरीब व शेतकरी जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा स्वखर्चाने आयोजित केला जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली. आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या या सामाजिक आणि दिलासादायक उपक्रमांचे हिमायतनगर तालुकाभरातून विशेष कौतुक केले जात आहे.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



