वेणी धरणातील पाण्यावर उद्योगाचा मोठा उपसा?
जिल्हाधिकाऱ्यांच्या जलसाठा संवर्धनाच्या आदेशानंतरही नॅचरल शुगरला पाणीपुरवठा सुरू; उपसा थांबविण्याची नागरिकांची मागणी

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव : महागाव तालुक्यातील गुंज येथे असलेल्या नॅचरल शुगर अलाईड इंडस्ट्रीज युनिट क्रमांक २ या कारखान्यासाठी वेणी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा केला जात असल्याचे चित्र आहे. एकीकडे महागाव तालुक्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असताना दुसरीकडे उद्योगासाठी मोठ्या प्रमाणात जलसाठ्याचा वापर होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी १ सप्टेंबर रोजी जलसाठा कायम राहावा आणि दुष्काळी परिस्थितीत पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश दिल्याचे सांगण्यात येते. मात्र वेणी धरणातून कारखान्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपसा सुरू असल्याने या आदेशाच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महागाव तालुक्यातील नागरिक, पशुधन आणि शेतीसाठी उपलब्ध पाणीसाठा जपणे आवश्यक असताना उद्योगासाठी होणारा मोठ्या प्रमाणातील पाणीवापर तातडीने थांबवावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वेणी धरणातील पाणी नेमके किती प्रमाणात उद्योगासाठी वापरले जात आहे, याची प्रशासनाने तपासणी करावी आणि जलसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



