Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
महागाव

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला महागावात हरताळ?

बोरवेल खोदकाम सुरू; तलाव-नदीवर मोटारीही सुरूच, प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष
महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव : यवतमाळ जिल्ह्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असताना जिल्हाधिकाऱ्यांनी १ सप्टेंबर रोजी बोरवेल व विहिरींचे खोदकाम तसेच तलाव, नदीवरील मोटारपंपांद्वारे पाणी उपसा बंद करण्याचे आदेश दिल्याचे सांगण्यात येते. मात्र महागाव तालुक्यात या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे.
महागाव शहरातील मातोश्री शाळेसमोरील प्लॉटिंग परिसरात दोनशे फूटांपर्यंत बोरवेल खोदण्याचे काम सुरू असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले आहे. जिल्ह्यात बोरवेल खोदकामावर निर्बंध असताना खुलेआम सुरू असलेल्या या कामावर प्रशासन कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दुसरीकडे तालुक्यातील नदी व तलावांमधून मोटारीद्वारे पाण्याचा उपसा सुरू असल्याने आगामी काळात पाण्याची पातळी झपाट्याने कमी होण्याची भीती व्यक्त होत आहे. विशेषतः जनावरांसाठी पाण्याचे संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.
नदी व तलावांवरील अनधिकृत पाणीउपसा करणाऱ्या मोटारींचे वीज कनेक्शन तातडीने तोडून पाणीसाठा कायम ठेवावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दुष्काळी परिस्थितीत उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे असताना प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे.
त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची महागाव तालुक्यात अंमलबजावणी नेमका कोणता अधिकारी करणार? आणि नियमबाह्य बोरवेल तसेच तलाव-नदीवरील पाणीउपशावर कधी कारवाई होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button