यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत तालुका सोसायटी गटातील लढत रंगणार

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
डॉक्टर अंकुश देवसरकर यांची माघार; प्रकाश पाटील देवसरकर यांना पाठिंबा
महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
उमरखेड : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तालुका सोसायटी गटातील निवडणुकीत डॉक्टर अंकुश देवसरकर यांनी माघार घेत प्रकाश पाटील देवसरकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आता प्रकाश देवसरकर विरुद्ध राम देवसरकर अशी थेट लढत होणार आहे.
सोसायटी मतदारसंघातून माघार घेतल्याची घोषणा डॉक्टर अंकुश देवसरकर यांनी आज, ४ सप्टेंबर २०२६ रोजी नितीन भुतडा यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत केली. त्यांच्या माघारीमुळे निवडणुकीला आमनेसामने लढतीचे स्वरूप आले असून, उमरखेड तालुक्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.
दरम्यान, १५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या न्यायालयीन निर्णयाकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. सलग दहा वर्षे पदावर असलेली व्यक्ती निवडणुकीत उभी राहू शकत नाही, या मुद्द्यावर न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेचा निकाल लवकरच अपेक्षित आहे. परंतु १२ तारखेलाच बँकेचा निकाल लागत असल्याने . निवडणुकीनंतर
या न्यायालयीन निर्णयानंतर उमेदवाराला कोणते वळण मिळते, याकडे उमरखेड तालुक्यासह जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



