
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महागाव-उमरखेड येथे संयुक्त बळीराजा सहकार भव्य प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत खासदार संजय देशमुख यांनी जिल्हा बँकेच्या आर्थिक स्थितीचा मुद्दा उपस्थित करताना बँकेचा एनपीए ५४ टक्क्यांपर्यंत गेल्याचा दावा केला.
यावेळी देशमुख यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष मनीष पाटील यांच्या कार्यकाळावर टीका केली. त्यांच्या कार्यकाळात बँकेची आर्थिक स्थिती खालावल्याचा आरोप करत बँकेला अडचणीत आणण्यात त्यांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. बँकेचा एनपीए कमी करून ती पुन्हा सक्षम करण्यासाठी काँग्रेसच्या शेतकरी विकास आघाडीच्या उमेदवारांचा पराभव करून ‘छत्री’ चिन्हाच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, पालकमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेसह राज्यातील सहकारी बँकांमध्ये भाजप-युतीचे वर्चस्व निर्माण करण्याचे आवाहन केल्याचा उल्लेख सभेत करण्यात आला. राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनीही जुन्या कार्यकाळातील बँकेच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली.
सभेला आमदार किसन वानखडे माजी आमदार खडसे, ससाने ,प्रकाश पाटील ,अंकुश देवसरकर विजय माने,यांच्यासह विविध उमेदवार व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू दास जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन उमेदवार नितीन भुतडा यांनी केले.
या सभेमुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एनपीए, बँकेची आर्थिक स्थिती आणि शेतकरी हिताचे प्रश्न प्रचाराच्या केंद्रस्थानी आले असून, मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



