नांदेड पोलिसांची धडक कारवाई: नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ८५ गाड्या जप्त, १० चालकांवर ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’चे गुन्हे!

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
नांदेड ( प्रतिनिधी शेख खय्यूम):
शहर व जिल्ह्यात रस्ते वाहतूक सुरक्षित, शिस्तबद्ध व सुरळीत ठेवण्याच्या तसेच रस्ते अपघात रोखण्याच्या उद्देशाने नांदेड पोलिसांच्या वतीने विशेष मोहीम राबवण्यात आली. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखा, वजिराबाद, इतवारा व भोकर पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तसेच फिटनेस संपलेल्या वाहनांवर ही धडक कारवाई केली.
शहरात ८५ वाहने जप्त
१६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत वजिराबाद व इतवारा शहर वाहतूक शाखेच्या पथकाने आरसीपी प्लाटूनसह शहरात विशेष नाकाबंदी केली. यादरम्यान फिटनेस प्रमाणपत्र संपलेल्या आणि अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची सघन तपासणी करण्यात आली.
या कारवाईत वजिराबाद वाहतूक शाखेने ६०, तर इतवारा वाहतूक शाखेने २५ अशी एकूण ८५ वाहने जप्त केली. यामध्ये ऑटो, टाटा मॅजिक, टेम्पो, क्रूझर आणि दुचाकींचा समावेश आहे. ही सर्व वाहने पोलीस मुख्यालयात जमा करण्यात आली असून, त्यांचे नोंदणी प्रमाणपत्र व परवाना रद्द करण्यासाठी आरटीओकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
भोकर परिसरात १४५ वाहनांची तपासणी
भोकर शहर व परिसरातील महामार्गांवर वाहतूक कोंडी, अपघात आणि नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी भोकर पोलीस, आरटीओ आणि महामार्ग सुरक्षा पोलिसांच्या संयुक्त पथकाने दोन दिवसीय तपासणी मोहीम राबवली. यादरम्यान १४५ वाहनांची तपासणी करण्यात आली.
कारवाईचा तपशील:
३२ वाहनांवर कारवाई: मोटार वाहन कायद्याच्या कलम ६६/१९२ अन्वये कारवाई.
ड्रंक अँड ड्राईव्ह: दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या १० जणांवर कारवाई.
न्यायालयात खटले: १७ वाहनचालकांविरुद्ध न्यायालयात गुन्हे दाखल.
जप्ती: १२ संशयास्पद वाहने जप्त.
दंड वसूल: नियमभंगाप्रकरणी १ लाख १० हजार रुपयांचा दंड वसूल.
पोलीस अधीक्षकांचे आवाहन
मुदत संपलेली किंवा फिटनेस नसलेली वाहने रस्त्यावर आणू नयेत. तसेच दारू पिऊन वाहन चालवणे आणि क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहून नेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी दिला आहे. ही मोहीम पुढेही सुरूच राहील, असे पोलिसांनी स्पष्ट केले.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



