Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
Uncategorizedमहागाव

भोसा येथे ई क्लासमधून हजारो ब्रास मुरूम उपसा; शासनाचा महसूल बुडवल्याचा आरोप


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802


१५ ते २० ब्रासच्या रॉयल्टीवर हजारो ब्रास मुरूम? गोदाम बांधकामस्थळी पंचनामा करून वसुलीची मागणी
महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव : महागाव तालुक्यात भोसा येथील शासकीय ई-क्लास जमिनीमधून मोठ्या प्रमाणात मुरूम उत्खनन करून शासनाचा महसूल बुडविल्याचा आरोप पुढे आला आहे. संबंधित भोसा येथे गोदाम बांधकाम ठिकाणी तब्बल १० हजार ब्रासपर्यंत मुरूम टाकण्यात आल्याचे चित्र जिओ ट्रेकिंग मध्ये दिसून येत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ठिकाणी केवळ १५ ते २० ब्रास मुरूमाची रॉयल्टी काढण्यात आल्याचा आरोप आहे. मात्र दुसऱ्या शेतातील रॉयल्टीच्या आधारे मोठ्या प्रमाणात मुरूम उत्खनन करून वापरण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. सध्या भोसा या ठिकाणी गोदाम बांधकामाचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकरणाची महसूल विभागाने तातडीने स्थळ पाहणी करून पंचनामा करावा, प्रत्यक्ष मुरूमाचे मोजमाप करावे आणि शासनाचा बुडालेला महसूल व दंड वसूल करावा, अशी मागणी एकता पत्रकार संघाने केली आहे.
पांदण रस्त्यावरही अतिक्रमणाचा आरोप
दरम्यान, शासनाच्या नकाशावर असलेल्या भोसा येथील गोदामा जवळील पांदण रस्त्यावर अतिक्रमण करून तो ताब्यात घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या ये-जा करण्याच्या मार्गाचा प्रश्न निर्माण झाला असून, संबंधित अतिक्रमणाची पाहणी करून तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या सर्व प्रकरणांचा समावेश दि. ३० सप्टेंबरपासून प्रस्तावित आमरण उपोषणाच्या मागण्यांमध्ये एकता पत्रकार संघाने केला आहे. आता महसूल प्रशासन या आरोपांची प्रत्यक्ष चौकशी करून शासनाचा महसूल वाचविण्यासाठी काय कारवाई करते, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button