Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
महागाव

२० गावांत ‘एक गाव, एक गणपती’चा उपक्रम; वाहतूक व अवैध दारूविक्रीवरही पोलिसांची नजर


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर महागाव पोलीस ठाण्यात दि. १८ सप्टेंबर २०२६ रोजी शांतता समितीची बैठक घेण्यात आली. गणेशोत्सव शांततेत व नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
गणपती मंडळांकडून ९९ अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी ८० गणेश मंडळांना ऑनलाइन परवानगी देण्यात आली आहे. तसेच महागाव तालुक्यातील २० गावांत ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यासाठी ठाणेदार वानखडे यांनी पुढाकार घेतला आहे. ज्या मंडळांनी अद्याप ऑनलाइन परवानगी घेतलेली नाही, त्यांनी तात्काळ परवानगी घेण्याचे आवाहन करण्यात आले.
महागाव शहरातील अवैध देशी दारू विक्रीवर आळा घालण्यासोबतच बसस्थानक परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न बैठकीत उपस्थित करण्यात आला. बसस्टॉप परिसरात वाहतूक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून रस्त्यावर अस्ताव्यस्त वाहने उभी राहणार नाहीत, याची दक्षता घेतली जाईल, असे ठाणेदार वानखडे यांनी सांगितले.
यावेळी ज्येष्ठ नेते संभाजीराव नरवाडे यांनी मार्गदर्शन केले. पत्रकारांच्या वतीने संजय भगत यांनी वाहतूक व्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करून प्रभावी अंमलबजावणीची मागणी केली.
महागाव बसस्टॉप तसेच वसंतराव नाईक परिसरात अवैध वाहतूक व अडथळा निर्माण करणारी वाहनांची पार्किंग होणार नाही, यासाठी पोलिसांकडून दक्षता घेतली जाईल, असे ठाणेदार वानखडे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, गणपती विसर्जन ठरलेल्या वेळेत व नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्याचे मीटिंगमध्ये निश्चित करण्यात आले. शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button