महागावजवळ टेकडी पोखरली; हजारो ब्रास मुरूम उत्खननाचा आरोप
करंजखेड जनूना परिसरातील ई-क्लास जमिनीवर मोठ्या प्रमाणात उत्खनन; महसूल विभागाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव : महागाव तहसील कार्यालयापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर, करंजखेड रस्त्यावरील जुनूना परिसरात ई-क्लास जमिनीमधून मोठ्या प्रमाणात मुरूम उत्खनन झाल्याचा आरोप पुढे आला आहे. संबंधित ठिकाणी संपूर्ण टेकडीच पोखरल्याचे आणि हजारो ब्रास मुरूम उत्खनन झाल्याचे चित्र दिसून येत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, तहसील कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्खनन होत असतानाही महसूल विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या प्रकरणात तहसीलदार अभय मस्के यांच्या कार्यकाळात महसूल प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. अवैध उत्खननाला महसूल प्रशासनाची साथ असल्याचा आरोप पत्रकार संघाने केला असून, या आरोपांची स्वतंत्र चौकशी होणे आवश्यक आहे.
संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा, उत्खननाचे मोजमाप, रॉयल्टीची तपासणी आणि शासनाच्या महसुलाची वसुली करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
जिल्हाधिकारी काय भूमिका घेणार?
महागाव तालुक्यातील अवैध उत्खननाच्या तक्रारींची मालिका सुरू असताना आता तहसील कार्यालयापासून जवळच असलेल्या करंजखेड जनूना परिसरातील प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी या प्रकरणाची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर काय कारवाई करतात, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



