Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
शहर

तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत संस्कार पोद्दार स्कूलची चमक; सहा विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



एस पी दळवी
उमरखेड : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत संस्कार पोद्दार स्कूल, उमरखेडच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

या स्पर्धेत शाळेच्या सहा विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. निवड झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे –

१४ वर्षे वयोगट मुले : विश्वजीत पाईकराव, राधेश्याम शिंदे
१४ वर्षे वयोगट मुली :सिद्धी येरावार
१७ वर्षे वयोगट मुले : बाळासाहेब देशमुख
१७ वर्षे वयोगट मुली : पल्लवी पाईकराव, निधी जैन

या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांवर मात करत हे यश मिळवले. या यशाबद्दल शाळेच्या व्यवस्थापक मंडळ व प्राचार्य यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा मार्गदर्शक भावेश पटेल, सागर शेरे व सचिन शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा संयोजक वैभव मांडवगडे, भूषण बजाज, क्रीडा मार्गदर्शक शकील मोहम्मद यांच्यासह इतर मान्यवरांनी परिश्रम घेतले.

या यशाबद्दल शिक्षक, पालक व क्रीडाप्रेमींमधून विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button