Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
Uncategorized

महागावच्या सोसायटी मतदारसंघात निवडणुकीची रंगत वाढली!
छाननीत पाचही उमेदवारांचे अर्ज कायम; सुचकाच्या पाठिंब्याने राजकीय गणिते बदलली


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802


महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महागाव तालुक्यातील सोसायटी मतदारसंघात चांगलीच रंगत निर्माण झाली आहे. या मतदारसंघातून माजी संचालक संभाजीराव नरवाडे, शिवाजी राठोड, शिवाजी देशमुख, नितीन भुतडा आणि पंजाबराव खडकेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. १५ सप्टेंबर रोजी झालेल्या छाननीमध्ये या पाचही उमेदवारांचे अर्ज कायम राहिल्याने २८ प्रतिनिधींच्या मतदारसंघात आता थेट निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे.
अर्ज छाननी पूर्ण झाल्यानंतर आता प्रत्येक उमेदवाराकडून मतदारांची जुळवाजुळव आणि मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. कोणाच्या पारड्यात किती सोसायट्यांचे प्रतिनिधी जातात, यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून राहणार असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.
सुचक- अनुमोदकाच्या मुद्द्यावरून चर्चेला उधाण
दरम्यान, उमेदवारी अर्जासाठी सुचक म्हणून सही देण्याच्या मुद्द्यावरूनही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. अनुभवी संचालकाच्या उमेदवारी अर्जासाठी सुचकाची सही देताना दोन लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप संबंधितांकडून करण्यात आला आहे. या आरोपामुळे निवडणुकीच्या प्रक्रियेत आर्थिक व्यवहारांचा मुद्दा चर्चेत आला असून, आरोपाची सत्यता संबंधितांनी स्पष्ट करणे अपेक्षित आहे.
राष्ट्रवादीच्या गडात काँग्रेसला पाठिंबा?
महागाव तालुका हा आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव असलेला मतदारसंघ म्हणून ओळखला जात असताना यावेळी राजकीय समीकरणांना वेगळे वळण मिळाल्याचे दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सिताराम पाटील यांनी काँग्रेसचे माजी मध्यवर्ती बँक संचालक संभाजीराव नरवाडे यांच्या उमेदवारी अर्जावर सुचक म्हणून सही केल्याने या राजकीय घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या पाठिंब्यामुळे सोसायटी मतदारसंघातील पारंपरिक राजकीय गणिते बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पंजाबराव खडकेकर माघार घेणार?
दरम्यान, पंजाबराव खडकेकर हे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र याबाबत अंतिम निर्णय काय होतो, हे माघारीच्या अंतिम टप्प्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
पाच उमेदवारांचे अर्ज कायम राहिल्याने सध्या सोसायटी मतदारसंघात प्रत्येक मताला महत्त्व आले आहे. कोणता उमेदवार कोणासोबत जाणार, कोण माघार घेणार आणि कोणाच्या बाजूने निर्णायक राजकीय जुळवाजुळव होणार, याकडे आता संपूर्ण महागाव तालुक्याचे लक्ष लागले आहे.
२८ मतदार प्रतिनिधी, पाच उमेदवार आणि बदलती राजकीय समीकरणे यामुळे यंदाची जिल्हा बँक निवडणूक महागावच्या सोसायटी मतदारसंघात चुरशीची होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पुढच्या अंकात सविस्तर


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button