सामाजिक

बाळदी येथे काकड आरती उत्साहात साजरी

अतिश वटाणे
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड

कार्तीक मासा नीमीत्य मौजा बाळदी ता. उमरखेड येथे श्री गुरुदेव भजनी मंडळा तर्फे गेली ४० वर्षा पासुन काकड आरती सकाळ च्या प्रहारात ग्राम प्रदर्शना करीत

असते.काकड आरती चा उगम केव्हा व कसा झाला या संदर्भात एक अख्यायीका सांगीतल्या जाते . फार वर्षा पुर्वी एका राज्यामध्ये एक तारकासुर नावांचा रक्षेस जनतेला नाहक त्रास देत होता.जनता अतीशय त्रासुन गेली होती.याच महीन्यात भगवान शकराचा महापराक्रमी पुत्र कार्तीक स्वामीनी त्या दृष्ट रक्षेसाचा वध करून जनतेला त्या

तारकासुराच्या नाहक त्रासापासून मुक्त केल.राक्षसाचा वध झाला समजताच जनता अतीशय आनंदी झाली आनंदउत्सव साजरा करू लागली.कार्तीक स्वामीनी आपलाला जीवदान दिल अस समजुन लोकांनी कार्तीक स्वामीचा उदय उदय करन सुरू केला.त्यांच्या कार्याची आठवण राहावी म्हणून गावोगावी याच महीन्यात काकड आरती सुरू करण्याची प्रथा सुरु झाली अशी अख्यायीक आळंदी ते पढरपूर या वारी मध्ये एका कीर्तनात ऐकण्यात आली.या महिन्यात सकाळ च्या प्रहारात भजनी मंडळे गावातील प्रमुख रस्त्यावरून टाळमृदुंगाच्या अवाजाने व अभंगाच्या आर्त आळवणीच्या स्वरानी वातावरण कस भक्तीमय होऊन करून

टाकतात.अभंग ऐकणारा जन समुदाय मनोमन डोलू लागतो.दिंडी रस्त्यावरून जात असताना गावातील महीला असो या पुरुष भक्तीभावाने दिंडीला आरतीने ओवाळून सन्मानीत करीत असतात.घरासमोर सडा टाकून सुशोभीत रांगोळी काढून भजनी मडळाचे स्वागत करत असतात . कार्तीक पोर्णीमेला श्री प्रल्हाद सखारामजी दूधे यांचे राहाते घरी महाप्रसाद केला जातो आणि त्याच दिवशी दिंडीची सांगता केली जाते . हा महीना फार पवित्र मानल्या जातो याच महीन्यात हिन्दू धर्मातील दिपावली सारखा फार मोठा सण साजरा केला जातो . मराठी महीन्यातील कार्तीक महीना हा कार्तीक स्वामीच्या नावावरून च या महित्याला नाव दिला असावा अस महटल तर काही वावग होणार नाही . असा हा आनदा चा सोहळा दरवर्षी आमच्या गावातील श्री गुरुदेव भजनी मंडळाचे सर्वश्री सदस्य श्री भाऊरावजी शिरडकर , मारोतराव बदकुले , वामनराव दूधे , दत्तराव घायर , देवबन महाराज गोस्वामी , बलराम वानखेडे , पेटीमास्तर प्रकाश शेळके , मृदुंगाचार्य अविनाश घुसे सर टाळकरी धोंडीराम शेळके , प्रल्हाद दूधे व इतर भजनी मंडळातील सदस्य व बाल गोपाळा सह या काकड आरतीचा समारोप केल्या जातो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!