Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
क्रीडा

अल्प पावसाचे दुःख बाजूला सारत हिमायतनगरात नगराध्यक्ष शेख रफिक यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्जा-राजाचा पोळा थाटात संपन्न!

हिमायतनगरा

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

​हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम):
“अल्प पावसाचे संकट असले तरी शेतकरी बांधवांनी खचून न जाता धैर्याने सामोरे जावे. बळीराजाच्या पाठीशी नगर पंचायत प्रशासन खंबीरपणे उभे आहे,” असे प्रतिपादन लोकनियुक्त नगराध्यक्ष शेख रफिक शेख महेबूब यांनी व्यक्त केले.
​डोळ्यांसमोर करपणारी पिके, आभाळाकडे लागलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा आणि अल्प पावसाने निर्माण झालेले संकट; तरीही या सगळ्या वेदना बाजूला सारत बळीराजाने आपल्या सर्जा-राजाचा सण दणक्यात साजरा केला! वर्षभर शेतात खांद्याला खांदा लावून राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा बैलपोळा हिमायतनगर शहरात यंदाही पारंपारिक जल्लोषात साजरा झाला.
​खांदेमळणीपासूनच पोळ्याची लगबग सुरू झाली होती. शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या बैलांच्या शिंगांना आकर्षक रंग देत, झुली, गोंडे, कासरे, डोर आणि विविध सजावटींनी सर्जा-राजाला सजवले. अल्प पावसामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत असला तरी आपल्या बैलांवरील प्रेमात मात्र कुठलीही कमतरता दिसली नाही.
​मानाची बैलजोडी आणि भव्य मिरवणूक
सायंकाळी चार वाजता श्री परमेश्वर मंदिरापासून नगरपंचायतीच्या मानाच्या बैलजोडीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. नगराध्यक्ष शेख रफिक शेख महेबूब, श्री परमेश्वर मंदिराचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार, नगरपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक, मान्यवर आणि मोठ्या संख्येने शेतकरी या मिरवणुकीत सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या दणदणाट, पारंपरिक वेषभूषा आणि सजविलेल्या बैलजोड्या यामुळे शहरातील वातावरण अक्षरशः पोळामय झाले.
​हनुमान मंदिर मैदानावर मानाचा विवाह सोहळा
मिरवणूक दक्षिणमुखी हनुमान मंदिराच्या मैदानात पोहोचल्यानंतर सर्वांचे लक्ष मानाच्या बैलजोडीच्या विवाह सोहळ्याकडे लागले होते. ठरलेल्या सायंकाळी ४ वाजून ५० मिनिटांच्या शुभमुहूर्तावर मानाच्या बैलजोडीचा पारंपरिक विवाह सोहळा थाटात पार पडला. पुरोहित गजू गुरु वाळके यांच्या मधुर वाणीतून पाच मंगलाष्टकांचा गजर झाला आणि उपस्थितांनी या आगळ्यावेगळ्या सोहळ्याचा आनंद घेतला. विवाह सोहळा संपताच बैलांची मिरवणूक पुन्हा जोमाने निघाली व सर्जा-राजा आपल्या मालकाच्या घराकडे रवाना झाला.
​यंदाच्या अल्प पावसाच्या संकटातून शेतीला व शेतकऱ्याला उभारी मिळावी, अशी प्रार्थना याप्रसंगी करण्यात आली. तसेच नगरपंचायतीच्या वतीने महाप्रसादाचे (पुरणपोळीचे जेवण) आयोजन करण्यात आले होते. या सामूहिक भोजनाने उत्सवाची सांगता झाली.

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button