बैलांची संख्या घटली; दुसऱ्यांच्या बैलांची पूजा करून साजरा झाला पोळा!

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागावच्या जुने गावातील बजरंगबली मंदिर परिसरात पोळ्याची परंपरा कायम; नरवाडे परिवाराकडे मानकरीपदाचा मान
महागाव : महागाव नगरपंचायत हद्दीतील जुने गाव येथील बजरंगबली मंदिर परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक पद्धतीने पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र, यंदाच्या पोळ्यात बैलजोड्यांची घटलेली संख्या प्रकर्षाने जाणवली.
जुने गावातील पोळ्याचा मान नरवाडे परिवारातील चार मानकऱ्यांकडे असून, दरवर्षी त्यांच्या उपस्थितीत पोळ्याचा पारंपरिक सोहळा पार पडतो. यंदाही मानकरी परिवाराने पोळ्याची परंपरा जपत विधिवत पूजा-अर्चा केली.
मात्र, बदलत्या शेतीपद्धती आणि यांत्रिकीकरणामुळे गावातील बैलांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याचे चित्र दिसून आले. यंदा बैलजोड्या कमी असल्याने मानकरी परिवाराला दुसऱ्यांच्या बैलांची पूजा करून पोळ्याची परंपरा जपावी लागली. त्यामुळे ग्रामीण कृषी संस्कृतीतील बदलाचे वास्तवही या पोळ्यातून समोर आले.
बैलांना सजवून त्यांची पूजा करण्यात आली. या पारंपरिक सोहळ्याचा बालकांसह ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात आनंद घेतला. लहान मुलांमध्ये बैलपोळ्याबद्दल विशेष आकर्षण दिसून आले.
एकीकडे आधुनिक शेतीमुळे बैलांचे महत्त्व कमी होत असताना दुसरीकडे पोळ्यासारख्या सणांच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या जीवनातील बैलाचे स्थान आणि कृषी संस्कृतीशी असलेले नाते आजही जपले जात असल्याचे या सोहळ्यातून दिसून आले.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



