महागाव गटातून शिवाजीराव देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल काँग्रेसकडून उमेदवारी; महागावच्या राजकीय समीकरणांकडे जिल्ह्याचे लक्ष

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4732
महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी महागाव गटातून काँग्रेस गटाचे शिवाजीराव बाळासाहेब देशमुख (सौनेकर) यांनी ९ सप्टेंबर २०२६ रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या उमेदवारीमुळे महागाव गटातील निवडणुकीला आता राजकीय रंग चढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यात आघाडी होण्याचे संकेत मिळत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दुसरीकडे भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची आघाडी झाल्यास दोन्ही बाजूंमध्ये थेट राजकीय संघर्ष रंगण्याची शक्यता आहे.
महागाव गटातील समीकरणे दिवसेंदिवस बदलत असून, विविध पक्षांकडून आपापल्या उमेदवारांची जुळवाजुळव सुरू आहे. त्यामुळे अंतिम उमेदवारांची यादी आणि आघाडीचे स्वरूप स्पष्ट झाल्यानंतरच निवडणुकीचे खरे चित्र समोर येणार आहे.
भुतडा विरुद्ध महागावातील दिग्गज?
दरम्यान, उंबरखेड येथील रहिवासी असलेले आणि महागाव तालुक्यातील मुडाणा सोसायटी मतदारसंघाचे प्रतिनिधी नितीन भुतडा हे महागाव तालुक्यातील राजकीय नेत्यांचे संभाव्य प्रतिस्पर्धी म्हणून पुढे येत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे भुतडा यांच्या उमेदवारीमागील राजकीय समीकरणे आणि त्यांना मिळणारा पाठिंबा याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
महागाव गटात काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि मित्रपक्षांच्या संभाव्य आघाड्यांमुळे आगामी लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे. अंतिम टप्प्यात कोणता पक्ष कोणाच्या सोबत जातो आणि संभाजी दादा नरवाडे पंजाबराव देशमुख सिताराम ठाकरे हे कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देतो, यावर निवडणुकीचे समीकरण मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणार आहे. की या तिघापैकी एक उमेदवार रिंगणातील राहू शकतो
महागाव गटातील बदलती राजकीय समीकरणे, संभाव्य आघाड्या आणि प्रमुख उमेदवारांच्या हालचालींबाबत सविस्तर वृत्त पुढील अंकात वाचायला मिळणार आहे..
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4732



