Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4732
Uncategorized

मुडाणा सोसायटी मतदारसंघात नितीन भुतडा यांचा उमेदवारी अर्ज माजी आमदारांसह दिग्गजांची उपस्थिती; महागाव मतदारसंघाच्या राजकीय समीकरणांमुळे निवडणुकीत रंगत


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4732

महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे

महागाव : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी महागाव तालुक्यातील मुडाणा सोसायटी मतदारसंघातून नितीन भुतडा यांनी ७ सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, माजी आमदार ससाने, माजी आमदार खडसे तसेच विद्यमान उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन वानखेडे यांच्यासह मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित होते.

बलाढ्य राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत भुतडा यांनी अर्ज दाखल केल्याने मुडाणा सोसायटी मतदारसंघातील निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात युती झाल्यास महागाव मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला जाण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राज्यमंत्री इंद्रजीत नाईक यांनीही यासंदर्भात राजकीय संकेत दिल्याची चर्चा आहे.

त्यामुळे महागाव मतदारसंघ भाजपच्या वाट्याला यावा यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर नितीन भुतडा थेट मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती आहे. मतदारसंघ भाजपला मिळावा यासाठी पक्षश्रेष्ठींकडे प्रयत्न करण्याच्या हालचालींमुळे महागावच्या राजकारणात नवा पेच निर्माण झाला आहे.

जर मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला गेला, तर भुतडा यांना राष्ट्रवादीत प्रवेश करून निवडणूक लढवावी लागणार का, याबाबतही राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

राष्ट्रवादीकडून शिवाजी राठोड यांचे पारडे?

महागाव सोसायटी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवाजी राठोड यांचे नाव पूर्वीपासून चर्चेत आहे. मतदारसंघातील बंजारा समाजाचे सुमारे १२ प्रतिनिधी तसेच राष्ट्रवादीशी संबंधित प्रतिनिधी यामुळे राठोड यांचे पारडे जड असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

मात्र पंजाबराव खडकेकर, संभाजीराव नरवाडे आणि सीताराम ठाकरे हे तीनही प्रभावी चेहरे निवडणुकीचे समीकरण बदलण्याची क्षमता ठेवतात. त्यामुळे अंतिम मतदार यादी आणि उमेदवारांची स्थिती स्पष्ट झाल्यानंतरच प्रत्यक्ष लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

बिनविरोध निवडणुकीच्या हालचाली, पण ‘विश्वासघात’ कुणाचा?

जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा असली तरी राजकीय आखाड्यात शेवटच्या क्षणी कोणते समीकरण बदलते, हे सांगता येत नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून अंतिम उमेदवार यादी जाहीर होईपर्यंत पडद्यामागे राजकीय डावपेच सुरू राहण्याची शक्यता आहे.

त्यामुळे मुडाणा सोसायटी मतदारसंघात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत होते की समझोता होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अंतिम उमेदवार निश्चित झाल्यानंतरच कोण कोणाच्या विरोधात मैदानात उतरते, हे स्पष्ट होणार असून, या निवडणुकीत चांगलीच रंगत पाहायला मिळण्याची चिन्हे आहेत.


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4732

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4732

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button