Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4732
शहर

अवैध धंद्यांवर धडक कारवाई; हिमायतनगर पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांचा नागरिकांकडून शाल व पुष्पहार घालून भव्य सत्कार!


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4732


​हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम):
​हिमायत नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी २ जून रोजी पदभार स्वीकारल्यापासून शहरात कायदा आणि संविधानाची कडक अंमलबजावणी केली आहे. अवैध धंद्यांवर कायदेशीर चौकटीत राहून धडक कारवाई केल्यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिली आहे. पोलीस प्रशासनाने नागरिकांना पारदर्शक सेवा व सुरक्षिततेचे वातावरण मिळवून दिल्याबद्दल सर्वसामान्यांमधून अत्यंत समाधान व्यक्त केले जात आहे.
​पोलीस प्रशासनाच्या या मुस्तैद आणि संविधानिक कामगिरीची दखल घेत हिमायतनगर येथील नागरिकांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांची आदरपूर्वक भेट घेतली. याप्रसंगी त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांना शाल पांघरून, पुष्पहार घालून आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
​याप्रसंगी उपस्थित नागरिक:
​शेख खय्यूम (हिमायतनगर तालुका प्रतिनिधी, उमरखेड वार्ता)
​शेख युसूफ (तालुका अध्यक्ष, ऑल इंडिया मुस्लिम युवा टायगर सेना)
​शेख अख्तर खान (कट्टर भाजप कार्यकर्ते)
​शेख सलीम (सामाजिक कार्यकर्ते)
​अब्दुल सलाम
​कायद्याच्या चौकटीत राहून शहरात शांतता, सुव्यवस्था व सुरक्षितता प्रस्थापित केल्याबद्दल सर्व उपस्थितांनी पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांचे मनःपूर्वक आभार मानले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4732

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4732

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button