Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4732
Uncategorized

सरपंच आरक्षणाच्या फेरसोडतीतून दिग्गजांना फटका महागाव तालुक्यात ग्रामपंचायतींच्या सुधारित आरक्षणाची सोडत; एससी-एसटी आरक्षण कायम, ओबीसी व खुल्या प्रवर्गात फेरबदल


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4732


महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव : आरक्षणाची एकूण मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा अधिक झालेल्या जिल्ह्यांमध्ये ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी राज्य शासनाने केलेल्या सुधारित तरतुदीनुसार महागाव तालुक्यातही सरपंचपदाच्या आरक्षणाची फेरसोडत बुधवारी (९ सप्टेंबर) काढण्यात आली. तहसील कार्यालयाच्या सभागृहात तहसीलदार अभय मस्के यांच्या हस्ते ही प्रक्रिया पार पडली.
१२ ऑगस्ट २०२६ रोजीच्या शुद्धीपत्रकानुसार राज्यातील ज्या १५ जिल्ह्यांमध्ये सरपंचपदाच्या आरक्षणाची एकूण मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहे, त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्याचा समावेश आहे. मात्र, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणावर आधारित असल्याने त्यात कोणताही फेरबदल करण्यात आलेला नाही. नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) आणि खुल्या प्रवर्गातील आरक्षणात फेरबदल करण्यात आला आहे.
महागाव तालुक्यात उपलब्ध आरक्षणाच्या यादीनुसार अनुसूचित जातीसाठी ९, अनुसूचित जमातीसाठी १०, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी १९ आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी ३९ ग्रामपंचायतींचे सरपंचपद निश्चित करण्यात आले आहे. याशिवाय प्रत्येक प्रवर्गातील महिला आरक्षणाचीही स्वतंत्र सोडत काढण्यात आली.
तालुक्यात नव्याने निर्माण झालेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षणही स्वतंत्रपणे निश्चित करण्यात आले. त्यामध्ये सुधाकरनगरला अनुसूचित जमाती, मनोहरनगरला अनुसूचित जमाती (महिला), साधुनगरला सर्वसाधारण महिला आणि मोरखेडीला सर्वसाधारण (महिला) आरक्षण देण्यात आल्याची माहिती आहे.
महिला आरक्षणामुळे दिग्गज नेत्यांचा हिरमोड
सरपंचपदाच्या नव्या आरक्षणामुळे तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये महिला नेतृत्वाला संधी मिळणार आहे. अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, ओबीसी महिला आणि सर्वसाधारण महिला अशा स्वतंत्र प्रवर्गांमध्ये आरक्षण निश्चित झाल्याने निवडणुकीची तयारी करणाऱ्या अनेक पुरुष नेत्यांना आता आपल्या कुटुंबातील महिलांना पुढे करावे लागणार आहे. त्यामुळे गावपातळीवरील राजकीय समीकरणांनाही मोठी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.
फुलसावंगी ग्रामपंचायतीत मागील अनेक वर्षांपासून महिला राज असल्याने यंदाच्या आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. नव्या आरक्षणातही महिला प्रवर्ग कायम राहिल्याने स्थानिक नेतेमंडळींचा हिरमोड झाल्याची चर्चा आहे.
महागाव तालुक्यात यापूर्वी ७६ ग्रामपंचायतींचा समावेश होता. नव्याने सहा ग्रामपंचायतींची भर पडल्याने आता तालुक्यातील ग्रामपंचायतींची संख्या ८२ वर पोहोचली आहे. त्यामुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये नव्या आरक्षणाचा परिणाम स्थानिक राजकारणावर मोठ्या प्रमाणात दिसून येणार आहे.


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4732

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4732

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button