Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4732
Uncategorized

कोरड्या दुष्काळाचा बळी की शासनाच्या अनास्थेचा?शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अश्रू पुसा; मानसिक धीर द्या — मनीष जाधव


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4732


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
, दि. ८ सप्टेंबर २०२६ : पुसद तालुक्यातील काटखेडा येथील शेतकरी अनिल मधुकर जाधव (वय ४५) यांचे मंगळवारी सकाळी ६.१५ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. यंदाच्या खरीप हंगामातील सोयाबीन व कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने ते मागील काही दिवसांपासून चिंतेत होते. कर्जाची परतफेड, कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि पुढील परिस्थितीची चिंता त्यांच्या मनावर असल्याचे कुटुंबीय व ग्रामस्थांनी सांगितले.

अनिल जाधव यांच्या निधनाने काटखेडा गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व आई असा परिवार आहे. त्यांच्या शेतीवर बँकांचे सुमारे दोन लाख रुपयांचे कर्ज असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, शेतकरी नेते मनीष जाधव यांनी काटखेडा येथील शेतशिवाराची पाहणी केली होती. यावेळी करपलेली उभी पिके पाहून त्यांनी जिल्हाधिकारी विकास मीना व पुसद तहसीलदार रेखा वाणी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत परिस्थितीची माहिती दिली होती. प्रत्यक्ष पिकांच्या नुकसानीचा विचार करून तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, पीक विम्याचा लाभ द्यावा आणि हेक्टरी एक लाख रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.

“हा केवळ कोरड्या दुष्काळाचा बळी नाही, तर शासनाच्या अनास्थेचाही बळी आहे. नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे अश्रू पुसावेत आणि या संकटाच्या काळात त्यांना मानसिक धीर द्यावा,” अशी मागणी मनीष जाधव यांनी केली.

पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे पिकांचे नुकसान झाले असून भविष्यात चारा व पाणीटंचाईचे संकटही गंभीर होण्याची शक्यता आहे. सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी मानसिक तणावाखाली आहे. त्यामुळे शासनाने तातडीने दुष्काळी उपाययोजना करून शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक आधार द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिलीप राठोड, विकास राठोड यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.

अनिल जाधव यांच्या कुटुंबाला शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी घटना शासनाच्या आर्थिक मदतीस पात्र बसावीअशीही मागणी यावेळी करण्यात आली


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4732

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4732

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button