Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4732
शहर

अज्ञात वाहनाच्या धडकेत मंगेश कुसंगवार यांचा मृत्यू महागावातील अपघातांवरून अतिक्रमणाचा प्रश्न ऐरणीवर; महामार्गावरील अतिक्रमणे हटविण्याची नागरिकांची मागणी

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4732

महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव : महागाव शहरातील प्रभाग क्रमांक ९ मधील रहिवासी मंगेश कुसंगवार यांचे अज्ञात वाहनाच्या धडकेत अपघाती निधन झाल्याची दुर्दैवी घटना दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री कलगाव टी-पॉईंट ते महागाव नदीवरील पूल या मार्गादरम्यान घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
महागाव परिसरात सातत्याने अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान, तुळजापूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीत जागोजागी अतिक्रमणे झाल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. रस्त्याच्या हद्दीत झालेल्या अतिक्रमणांमुळे वाहनांना मार्ग काढताना अडचणी निर्माण होऊन अपघाताचा धोका वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
तुळजापूर-नागपूर महामार्गावर यापूर्वीही अनेक अपघात होऊन नागरिकांना जीव गमवावा लागल्याने रस्ते सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने केवळ अपघातानंतर कारवाई न करता महामार्गाच्या हद्दीची तातडीने पाहणी करून अतिक्रमणे हटवावीत आणि वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करून द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
महामार्गावरील अतिक्रमणांबाबत न्यायालयीन निर्देशांचे पालन करून संबंधित विभागाने नियमांनुसार कारवाई करावी. तसेच अपघातप्रवण ठिकाणांची पाहणी करून आवश्यक सुरक्षा उपाययोजना, प्रकाश व्यवस्था, दिशादर्शक फलक आणि वाहतूक नियंत्रणाच्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशीही मागणी नागरिकांनी केली आहे.
मंगेश कुसंगवार यांच्या दुर्दैवी निधनामुळे परिसरात शोककळा पसरली असून, अपघातांची मालिका रोखण्यासाठी प्रशासन आता ठोस पावले उचलणार का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4732

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4732

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button