Uncategorized

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम द्या – राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाची मागणी

उमरखेड जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम द्यावा या प्रमुख मागणीसाठी यवतमाळ शहरात बामसेफ प्रणित राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओबीसी) मोर्चाच्या वतीने जिल्हास्तरीय बेमुदत धरणे प्रदर्शन सुरू आहे. “उठो ओबीसी, जागो, संघर्ष का धागा बनो” आणि “जनगणना में ओबीसी कॉलम आना ही चाहिए” अशा घोषणांनी आंदोलन स्थळ दणाणून गेले आहे.

शहरातील आझाद मैदान येथील महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मारकाजवळ हे आंदोलन सुरू आहे. राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाद्वारे देशातील ३१ राज्य आणि ६५० जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी विकास पटेल यांच्या नेतृत्वात चरणबद्ध राष्ट्रव्यापी बेमुदत धरणे प्रदर्शन घोषित करण्यात आले आहे.त्याचाच भाग म्हणून यवतमाळ जिल्ह्यात हे आंदोन सुरू आहे.

या आंदोलनाच्या माध्यमातून २०२७ च्या जनगणनेत ओबीसीसाठी स्वतंत्र कॉलम द्यावा, शिक्षणाचे खाजगीकरण थांबवावे, शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा आणि शिक्षणात संविधानाचा समावेश करावा, यूजिसी बिल आणखी खडक करूनagu करण्यात यावे, आरटीइ या कायद्यातील कलम 23 रद्द करून सर्व शिक्षकाना लादलेली टीइटी परीक्षा रद्द करण्यात यावी.
यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. ओबीसी समाजाची खरी लोकसंख्या आणि त्यांची सामाजिक-आर्थिक परिस्थिती समोर येण्यासाठी जातनिहाय जनगणना गरजेची असल्याचे आंदोलकांनी यावेळी सांगितले.

उमरखेड येथून जाहीर पाठिंबा

या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी उमरखेड तालुक्यातून विविध सामाजिक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत पाठिंबा दिला.
राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचे अक्षय सूर्य आणि बहुजन मुक्ती पार्टीचे इंजि. विद्वान केवटे यांच्या नेतृत्वात हा जत्था यवतमाळ येथे दाखल झाला.
यामध्ये राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे शेख जब्बार, शेख सफदर, मोबीन खान, विलास गायकवाड, इरफान खान, मिलिंद चिकाटे, संजय बनसोडे, अजीज खान, शेख एजाज, मल्हारी दवणे, कृष्णा पाटील चंद्रवंशी, बहुजन मुक्ती पार्टीचे मुजाहिद खान, लहुजी क्रांती मोर्चाचे दिलीप कलाले यांसह विविध सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत आंदोलनाला पाठिंबा दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button