निजधाम आश्रम विद्यालयात ‘गुड टच-बॅड टच’वर मार्गदर्शन निजधाम आश्रम विद्यालयात ‘गुड टच-बॅड टच’वर मार्गदर्शन विद्यार्थिनींना स्वसंरक्षण, सुरक्षितता आणि आत्मविश्वासाबाबत मार्गदर्शन

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4732
महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात मुडाणा येथील निजधाम आश्रम उच्च माध्यमिक विद्यालय, मुडाणा येथे इयत्ता ८वी ते १२वीच्या विद्यार्थिनींसाठी ‘गुड टच-बॅड टच’ या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थिनींमध्ये चांगला व वाईट स्पर्श याबाबत जागरूकता निर्माण करणे, स्वसंरक्षण व सुरक्षिततेच्या उपाययोजनांची माहिती देणे, तसेच आत्मविश्वास आणि योग्य निर्णयक्षमता विकसित करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
‘स्वतःची सुरक्षा हीच खरी शक्ती’ हा संदेश देत विद्यार्थिनींना असुरक्षित परिस्थिती ओळखणे, अशा प्रसंगी योग्य भूमिका घेणे, स्वतःचे संरक्षण करणे तसेच गरज भासल्यास विश्वासू व्यक्ती अथवा संबंधित यंत्रणेकडे मदत मागणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
गुलाम नबी आझाद समाजकार्य महाविद्यालय, पुसद येथील प्रा. डॉ. स्वाती दळवी यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. त्यांनी मुलींनी आपल्या सुरक्षिततेबाबत सदैव सजग राहून कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीचा आत्मविश्वासाने सामना करावा, असे आवाहन केले.
यावेळी निजधाम आश्रम संस्था, मुडाणा चे अध्यक्ष परशराम वानखेडे, मुख्याध्यापक सावंत, प्रशासक सतीश जाधव सर, भाविक मॅडम, प्रा. अमोल बोक्से यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनींची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थिनींसाठी अत्यंत संवेदनशील व आवश्यक असलेल्या विषयावर आयोजित या मार्गदर्शन कार्यक्रमामुळे मुलींमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण होण्यास तसेच आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4732



