महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त सत्यशोधक भाऊसाहेब माने समाजभूषण पुरस्कार जाहीर

चौकट : भाऊसाहेब माने गौरव कृती समितीचे आयोजन
शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
उमरखेड : दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी भाऊसाहेब माने गौरव कृती समिती तर्फे 28 नोव्हेंबर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त सत्यशोधक भाऊसाहेब माने समाजभूषण पुरस्कार विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती तथा सामाजिक संस्थेला दिला जात असतो याही वर्षी दिनांक 28 नोव्हेंबर 2023 रोजी भाऊसाहेब माने गौरव कृती समिती तर्फे जिजाऊ सांस्कृतिक भवन पुसद रोड उमरखेड येथे दुपारी २ वाजता या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते भाऊसाहेब माने गौरव कृती समितीचे मार्गदर्शक तथा कृषी महाविद्यालय उमरखेडचे चेअरमन डॉ .विजयराव माने यांच्या अध्यक्षतेखाली तथा श्रीकांत देशमुख अप्पर आयुक्त तथा साखर संचालक ( सेवानिवृत्त ) साहित्य अकादमी सन्मान भारत सरकार पुरस्कार प्राप्त यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत दिला जाणार आहे त्यामध्ये स्व. जेठमलजी माहेश्वरी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ . नारायणराव वानखेडे ( शिक्षणक्षेत्र ) स्व. नारायणराव पाटील वानखेडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बापुराव माने सर (जीवनगौरव ) स्व. रामचंद्र शिंगणकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ
स्व. बंकटलाल भुतडा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नामदेवराव पतंगे (उद्योजक ) स्व. परसराम पिलवंड यांच्या स्मृतीप्रित्यर्थ
डॉ . वि . ना . कदम ( लेखक – झाड आणि झेंन्डा आत्मचरीत्र )

स्व. अमानुल्ला जहागीरदार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ
बजरंग पवार ( दिव्यांग )स्व. वामनराव उत्तरवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शैलेश ताजवे ( उत्कृष्ठ लेखन पत्रकारीता ) स्व . भाई केशवराव देवसरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मेजर विलासराव वानखेडे ( माजी सैनिक )स्व. नारायणराव शिलार मामा यांच्या स्मृतीप्रित्यर्य
आशाताई विक्रम कलाने ( महीला सशक्तीकरण ) स्व. सखारामजी नरवाडे गुरुजी यांच्या स्मृतीप्रित्यर्य
मोहम्मद आरिफ मोहम्मद रियाज
(प्रशासकीय सेवा ) स्व. सखारामजी मुडे गुरुजी स्मृतीप्रित्यर्थ .शरद टोमके (एस टी . चालक समाजसेवा )स्व. नानासाहेब देशमुख स्मृतीप्रित्यर्य
प्रविण मोतीराम कदम चालगणी ( उत्कृष्ठ कास्तकार )
यांना वितरीत होणार आहे तरी या कार्यक्रमाला सर्वानी उपस्थित राहण्याचे आवाहन सत्यशोधक भाऊसाहेब माने गौरव कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे
