Uncategorized

करंजखेड येथे घरामध्ये खुलेआम पत्त्याचा डाव; युवकांची गर्दी, कारवाईची मागणी


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
करंजखेड गावात काही घरांमध्ये खुलेआम पत्त्याचा जुगार सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. दररोज या ठिकाणी चार–पाच टेबलांवर पत्त्याचा डाव रंगत असल्याचे चित्र दिसून येत असून, बाहेरगावाहूनही जुगार खेळण्यासाठी युवकांची मोठी गर्दी होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या प्रकारामुळे परिसरातील वातावरण बिघडत असून, तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असल्याची चिंता गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. शेजारील व बाजार परिसरातील नागरिकांनी आमच्या प्रतिनिधीकडे फोटो पाठवून तक्रार केली असून, हा प्रकार तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे.


घरामध्ये खुलेआम सुरू असलेल्या या जुगाराच्या अड्ड्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असून, संबंधित बीट जमादार व पोलीस प्रशासन यावर कारवाई करणार का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणात पोलीस प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पत्त्याच्या डावावर कारवाई करावी व दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी जोरदार मागणी करंजखेड येथील नागरिकांकडून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button