सामाजिक

तालुक्यातील अधिकारी होऊ शकतो आमदार !

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192

उमरखेड – तालुका स्तरावर अधिकारी म्हणून कार्यरत असलेले प्राविण्य प्राप्त असे वानखेडे, मागील तब्बल तीन वर्षांपासुन ग्रामीण भागातील सर्व सामान्य गोर गरीब जनतेची कामे सहजरीत्या करून, गोरगरीबांचे मसीहा ठरत आहेत. शासकीय कामाचा लाभ देत असतांना समाजातील आर्थिक सामाजीक तथा धार्मिक कार्यात सढळ हाताने मदत करीत आहेत त्यांच्या माणुसकीचा प्रत्यय सर्वच जाती – धर्मातील जनतेस येत असल्यामुळे, त्या अधिकाऱ्यास या विभागाचे विकासात्मक कार्य मोठ्या प्रमाणात करता यावे या करीता त्याना येणाऱ्या विधान सभा निवडणुकीत लोक प्रतिनिधी म्हनून निवडून देण्यात यावे अशी सर्व समाजातील जनतेची अपेक्षा व्यक्त होतांना दिसुन येत आहे. यामुळे सर्व पक्षीय नेत्यांमध्ये खळबळ उडत असल्याचे मत राजकीय विश्लेषक करीत आहेत. उमरखेड – महागांव विधान सभा मतदार संघ हा अनुसुचित जाती साठी राखीव असुन, या पूर्वीच्या आमदारांनी विधान सभेतील बेरोजगारांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी ठोस असे प्रकल्प किंवा शैक्षणीक दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न केले नसल्याची ओरड सातत्याने जनता करीत आहे. वानखेडे यांना विधान सभेतील प्रत्येक गांव खेड्यांच्या समस्यांचा सर्वांगीण सखोल अभ्यास असल्यामुळे ते विधान सभेतील सर्व प्रश्नांची सोडवणूक करू शकतील असा सुर उमटत आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!