शहर

नगरपंचायतीचा लाचार कारभार उघडा! मुस्लिम कब्रिस्तानच्या भिंतीला अतिक्रमणाचा विळखा; आंबेडकर चौकात रोजच अपघाताचा थरार!


​हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम): शहरात अतिक्रमणावर कारवाईचे निव्वळ नाटक करणाऱ्या हिमायतनगर नगरपंचायतीचा बेजबाबदार चेहरा पुन्हा एकदा उघडा पडला आहे. आंबेडकर चौक परिसरातील मुस्लिम कब्रिस्तानच्या बाउंड्री वॉलला विळखा घालून गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदेशीर अतिक्रमणाचा कारभार सुरू आहे. नगरपंचायतीचे अधिकारी डोळ्यांवर पट्टी बांधून गप्प बसल्याने शहराची शिस्त पूर्णपणे बिघडली आहे.
​या मोक्याच्या ठिकाणी बैलगाडीचे लोखंडी चाक, अवजड लाकडी आणि लोखंडी साहित्याचे भंगार थेट रस्त्यावर फेकून जागा व्यापली जात आहे. त्यामुळे दर बुधवारी भरणाऱ्या ‘भूतवारी बाजारात’ येणाऱ्या नागरिकांना आणि इतर विक्रेत्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. नगरपंचायतीने हे रस्ते अडवणारे बेकायदेशीर सामान तात्काळ जप्त करून हटवावे आणि तरकारी बाजार थोडा मागे हलवून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
​गरीब हातगाडीवाल्यांवर लगेच कारवाई करणाऱ्या प्रशासनाला या सामानावर कारवाई करताना नेमकी कोणाची भीती वाटते? असा जळजळीत सवाल जनता विचारत आहे. नगरपंचायतीने मुस्लिम कब्रिस्तानसमोरील हे सामान जप्त करून तरकारी बाजार मागे न हलवल्यास, अधिकाऱ्यांना जाब विचारत नगरपंचायत कार्यालयावर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button